आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईच्या या तरुणीशी लग्न करतोय क्रिकेटर क्रुणाल पंड्या, 27 डिसेंबरला विवाह सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा ऑल राउंडर आणि क्रिकेटर हार्दिक पंड्याचा भाऊ क्रुणाल पंड्या लवकरच विवाह करणार आहे. मुंबईच्या पंखुडी शर्मासोबत त्याच्या लग्नाची तारीख 27 डिसेंबर अशी ठरवण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यात इंडियन क्रिकेटर्ससह अनेक मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. पंड्या ब्रदर्सचे वडील हिमांशू पंड्या यांनी आमच्या वृत्त समूहाशी केलेल्या एक्सक्लूझिव चर्चेत रविवारी हा खुलासा केला आहे. 

 

- क्रुणालच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, ''घरात सर्वच कुटुंबीय लग्न सोहळ्यासाठी उत्साही आहेत. सगळेच क्रुणालच्या लग्नाच्या तयारी लागले आहेत.''
- ''हा विवाह मुंबईतील जे डब्लू मॅरिएट हॉटेलात पार पडणार आहे. यासाठी 1 हजार लोकांना निमंत्रण दिले जाणार आहे.''

 

कोण आहे पंखुडी
- क्रुणालची होणारी पत्नी पंखुडी शर्मा चित्रपटात मार्केटिंगमध्ये काम करते. याचवर्षी आयपीएलमध्ये या दोघांचे फोटोज व्हायरल झाले होते. यानंतर अनेकवेळा ती पंड्या बंधूंसोबत दिसली होती. 
- माध्यमांमध्ये क्रुणाल आणि पंखुडीच्या अफेअरची चर्चा सुरू झाली, त्यावेळी क्रुणालने आपण केवळ चांगले मित्र आहोत असे सांगितले होते. लग्न करतनाच नक्कीच सांगतो असे क्रुणाल म्हणाला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...