आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचे प्रशिक्षक व्हायला आवडेल : मॅकग्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. भारतात क्रिकेटची मुबलक गुणवत्ता आहे. त्यामुळे एमआरएफ पेस फाउंडेशनसाठी काम करताना आनंद मिळतो. मला जर कोणत्या देशाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याची संधी मिळाली तर त्यामध्ये भारत आणि ब्रिटन हे दोन देश प्रामुख्याने असतील, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाच्या माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने आज मुंबईत केले. हार्डिज या ऑस्ट्रेलियन वाइन कंपनीचा ब्रॅँड अॅम्बेसेडर म्हणून तो बोलत होता. ‘हार्डिज’ या कंपनीने भारतातील सुला वाइन्सशी नुकताच मित्रत्वाचा करार केला असून त्यानिमित्ताने मॅकग्रा भारतातील सर्व प्रमुख शहरांचा दौरा करीत आहे.

मॅकग्रा म्हणाला, भारतामध्ये वेगवान गोलंदाजांसाठी आदर्श, वेगवान, स्पोर्टिंग खेळपट्ट्या नाहीत. त्यामुळे खेळपट्टीवर चेंडू वेगात फेकणे हे कुणासाठीही मोठे आव्हान असते. मात्र, हेच भारतीय गोलंदाज अन्य देशांमध्ये स्पोर्टिंग खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करतात त्या वेळी ते अतिशय प्रभावी ठरतात.

अॅराेन, उमेशवर काैतुकाचा वर्षाव : मॅकग्राने या वेळी १५० चा वेग गाठण्याची क्षमता असलेल्या उमेश यादव व वरुण अॅराेनचा उल्लेख केला. तो म्हणाला हे दोघे खरोखरच वेगवान आहेत. मात्र, बांगलादेश दौ-यावर जाणा-या संघात वरुण अॅरोनला स्थान न दिल्याबद्दल मॅकग्राने आश्चर्य व्यक्त केले. याच ग्लेन मॅकग्राने स्वत: कधीही १५० चा वेग गाठला नव्हता. तो म्हणाला, मी कारकीर्दीत वेगात टाकलेला चेंडू १९९९ च्या विश्वचषकात लॉर्ड््सवर टाकला होता. त्याचा वेग ९२ किलोमीटर्स ताशी मैल होता.

तरीही ५०० पेक्षा अधिक बळी घेण्याची किमया कशी साधली? यावर मॅकग्राने सांगितले, ‘मी वेगात चेंडू टाकला असता तर त्याला उसळी अधिक मिळाली असती. माझी चेंडू वेगात टाकण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे मी चेंडूला टप्पा पडल्यानंतर अधिक उसळी कशी देता येईल यावर लक्ष केंद्रित केले. शिवाय अचूकता हा माझ्या यशाचा खरा शिल्पकार होता.’ स्वत:च्या करिअरमधील यशाचे रहस्य सांगताना मॅकग्रा म्हणाला, ‘माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौ-यानंतर मला ‘फिटनेस’चे महत्त्व कळले.

टी-२० मुळे कसाेटीचे नुकसान
भारताच्या आयपीएल स्पर्धेत मी सुरुवातीला होतो. टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचे नुकसान झाले आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. मात्र, भारताच्या आयपीएल स्पर्धेमुळे जगातील मान्यवर खेळाडूंच्या संगतीने, साक्षीने खेळतानाचा फायदा काय होतो ते मी स्वत: अनुभवले आहे. सेहवाग, डिव्हिलर्स, व्हिट्टोरी यांच्यासमवेत त्यांचे रुटीन तसेच व्यक्तिमत्त्व पाहून मी बरेच काही शिकलो.