आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC चा खुलासा, जडेजा-ब्रावो-रैनावरील आरोपांबाबत मोदींनी केला होता ई-मेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आईसीसी) आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी 2013 मध्ये पाठवलेल्या एका ई-मेलचा खुलासा केला आहे. मोदींनी शनिवार (27 जून) आपल्या ट्वीटमध्ये ई-मेलचा उल्लेख केला होता. भारतीय उद्योगपती बाबा दीवानकडून काही क्रिकेटपटूंना लाच दिली जात असल्याची माहिती मोदींनी या ई-मेलद्वारे दिल्याचे आयसीसीने म्हटले आहे. ‍क्रिकेटपटू रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि ड्वेन ब्रावो सट्टेबाजांना मदत केल्याचे मोदींनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले होते.

दुसरी, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा व ड्वेन ब्रावो यांनी आयपीएलमध्ये एकूण 60 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ललित मोदींचा आरोप बीसीसीआयने फेटाळला आहे. आयसीसीच्या चौकशीतूनही सत्य बाहेर येईल, असे सीसीआयने म्हटले आहे.
आयसीसीने वेबसाइटवर उघड केली माहिती...
आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांना ललित मोदींनी ई-मेल करून बाबा दीवान काही क्रिकेटपटूंना लाच देत असल्याची माहिती दिली होती. इतकेच नव्हे तर एंटी करप्शन यूनिटला ही माहिती देण्याची मागणीही केली होती. आयसीसीने आता ही माहिती आपल्या अधिकृत वेबसाइटवर उघड केली आहे.
आयपीएलमध्ये जडेजा-ब्रावो-रैनावर होता फिक्सिंगचा आरोप
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी शनिवारी एक मोठा खुलासा करून भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली होती. मोदी यांनी चेन्नई सुपर किंग्जचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो आणि सुरेश रैनावर इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सट्टेबाजीत सहभागी असल्याचा आरोप केला होता. ललित मोदी यांनी आपल्या 'ट्वीट' एक पत्र पोस्ट केले होते. मोदींनी हे पत्र 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांना पाठवले होते.
श्रीनिवासनचे जावई मयप्पन, राज कुंद्रावरही आरोप
टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना, ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावोचा (वेस्ट इंडीज) 'रियल एस्टेट टायकून' बाबा दीवान आर्थिक संबंध आहेत. बाबा दीवान हा क्रिकेटपटूंना लाच देत असल्याचा आरोप ललित मोदी यांनी दिला होता. तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा यांच्यासोबतही दीवान यांचे चांगले संबंध आहेत. हे सर्व क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करतात, असा आरोप मोदींनी केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ललित मोदी यांनी आयसीसीला पाठवलेली पत्र...