आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Cricket Committee To Meet In Mumbai On May 15 16

आयसीसीची आज बैठक: गोलंदाजांना १० ऐवजी १२ षटकांची संधी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारताचा माजी कर्णधार लेगस्पिनर अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या आयसीसीच्या क्रिकेट समितीची बैठक अाज (शुक्रवार) शनिवारी मुंबईत होत असून त्यामध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांवरील मर्यादा काही प्रमाणात शिथिल करण्याचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला किंवा संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला अन्य गोलंदाजांपेक्षा काही षटके अधिक गोलंदाजी करण्याची मुभा मिळेल.

फिरकी गोलंदाजांसाठी मारक ठरत असलेल्या सामन्यात दोन चेंडू वापराचा नियम रद्द करण्याचा आणि अखेरच्या षटकांमध्ये सीमारेषेनजीक क्षेत्ररक्षकच ठेवण्याच्या नियमाला रद्द करण्यासाठी भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत.

५० षटकांच्या सामन्यात फलंदाजाला कितीही षटके खेळता येतात. शतकानंतरही तो डाव पुढे सुरू ठेवू शकतो. फलंदाजी गोलंदाजी यात ताळमेळ साधण्यासाठी संघातील एक किंवा दोन गोलंदाजांना १० पेक्षा अधिक षटके गोलंदाजीची मुभा देण्याच्या नियमावर चर्चा होईल. रात्रीच्या कसोटी सामन्याचा प्रस्तावही चर्चेला येईल तसेच गोलंदाजीच्या अवैध अॅक्शनबाबतही विचारविनियम होईल. क्रिकेट समितीच्या मुंबई येथे हाेणाऱ्या बैठकीतील निर्णयांना बार्बाडोस येथील कार्यकारी मंडळाच्या आयसीसीच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
> बैठकीतील निर्णय हे महत्त्वपूर्ण ठरतील.
> गाेलंदाज फलंदाजांना फायदेशीर असे महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेणार.

जाचक नियमांवर निघणार ताेडगा
आशियाईदेशांना जाचक ठरत आहे तो चेंडू वापरण्याचा नियम. फिरकी गोलंदाजीसाठी आवश्यक तेवढा चेंडू २५ षटके वापरात आल्यास खडबडीत होत नाही. त्यामुळे सामन्यातील अखेरच्या षटकांमध्ये तो फिरकी गोलंदाजांसाठी अधिक सहायक ठरत नाही. ३० यार्ड वर्तुळाबाहेर ऐवजी खेळाडू ठेवण्याच्या नियमालाही आशियाई देशांचा जोरदार पाठिंबा आहे, असे कळते.

यंदापासून अाठ वर्षांचा क्रिकेट कार्यक्रम
यादोन नियमांत बदल करूनच बीसीसीआयने यंदापासून सुरू होणाऱ्या वर्षांच्या क्रिकेट कार्यक्रमाची आखणी केली आहे. सर्व प्रतिस्पर्धी बोर्डांशी करार करताना बीसीसीआयने या नियमातील बदल करूनच करारपत्र (एमओयू) तयार केले आहे. तिसऱ्या पंचांवर ‘नो बॉल’ पाहणे आणि पंचांचा निर्णय चुकीचा आहे असे जाणवल्यास तो बदलून देण्यासाठी काम करता येईल. याचा विचार बैठकीत होणार आहे.