आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC टेस्ट रँकिंगमध्ये भारताच्या कर्णधाराची \'विराट\' मुसंडी, 4 दिग्गजांना झटक्यात पछाडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकाविरुद्धच्या तीन टेस्ट सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत कॅप्टन विराट कोहलीने आणखी मजल मारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) च्या टेस्ट रँकिंगमध्ये त्याने उसंडी मारली आहे. तो जगातील दुसरा बेस्ट टेस्ट बॅट्समन बनला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, श्रीलंकेला टीम इंडियाने ज्या टेस्ट सिरीजमध्ये पराभूत केले त्यात एकट्या विराटने तब्बल 610 धावा काढल्या. त्याने हा स्कोर 152.50 च्या सरासरीने केल्या आहेत. श्रीलंका विरोधात त्याने केलेला हा स्कोर त्याच्या करिअरचा आतापर्यंतचा बेस्ट स्कोर आहे. आयसीसीच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन ठरला. तसेच टॉप 5 मध्ये चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानी आहे. विराट यापूर्वी 6 व्या क्रमांकावर होता.

 

टॉप-5 टेस्ट फलंदाज...

रँक  बॅट्समन टीम रेटिंग्स
1 स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलिया 938
2 विराट कोहली भारत 893
3 जोई रूट इंग्लंड 879
4 चेतेश्वर पुजारा भारत 873
5 केन विल्यमसन न्यूझीलंड 865

 

बातम्या आणखी आहेत...