आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयच्या दबावापुढेे आयसीसी नरमले; मतदानापूर्वीच प्रस्ताव मागे !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विरोधानंतर द्विस्तरीय कसोटी क्रिकेटचा प्रस्ताव गुंडाळला आहे. आयसीसीने बुधवारी मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत याची घोषणा केली. याप्रकरणी भारताला श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेशचे समर्थन मिळाले, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या प्रस्तावाच्या बाजूने होते. द्विस्तरीय कसोटी प्रस्तावाला पास करण्यासाठी १० कसोटी खेळणाऱ्या देशांपैकी किमान सात जणांचे समर्थन गरजेचे होते. बीसीसीआयच्या विरोधानंतर आयसीसीने या प्रस्तावावर मतदान घेण्याआधीच हा प्रस्ताव मागे घेतला. २००९ मध्येसुद्धा आयसीसीने अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम सर्वांना लागू केली होती. भारताच्या विरोधानंतर ते पुढे एेच्छिक करण्यात आले.
...तर चॅम्पियन ट्रॉफीत भारत खेळणार नाही
बीसीसीआयने पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ पाठवण्याची धमकी दिली आहे. आयसीसीच्या फायनान्स, कॉमर्स आणि चीफ एक्झिक्युटिव्ह समितीमध्ये भारताला एकही प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे नाराज बीसीसीआयने ही धमकी दिली.
बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के म्हणाले, ‘या समित्यांकडून सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. यात बीसीसीआयला प्रतिनिधित्व मिळणे हा अवमान आहे. यात बदल करण्यासाठी आम्ही आयसीसीला सांगितले आहे, अन्यथा आम्ही भारतीय क्रिकेटच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलू शकतो. आम्ही चॅम्पियन ट्रॉफीत खेळणार नाही, असेही शक्य आहे किंवा आम्ही खेळलो तर आमचा मुख्य संघ पाठवणार नाही. आयसीसी योग्य निर्णय घेईल, अशी आशा आहे.’

आयसीसीच्या राजकारणात बांगलादेश, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका बीसीसीआयचे मित्रगट मानले जातात. हे देश या योजनेला विरोध करीत होते. यादरम्यान भारताने आपली मजबूत भूमिका मांडली. भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले.

या पद्धतीमुळे कसोटीचे महत्त्व वाढले असते, असा तर्क आयसीसीचा होता. बरोबरीच्या संघात सामने असल्याने रोमांच वाढला असता. शिवाय रेलिगेट होण्याच्या भीतीने सर्व संघांनी चांगले प्रदर्शन केले असते. दुसऱ्या गटातील संघांनासुद्धा चांगल्या प्रदर्शनाचे फळ मिळाले असते.
कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या (१०) अाधीच कमी आहे. यात दोन गट करण्याला काहीच अर्थ नाही. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या देशांसाठी ही योजना नुकसानीची ठरेल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले हाेते.

कसोटी खेळणाऱ्या देशांना दोन गटांत विभागले जाणार. अव्वल गटात सात, तर दुसऱ्या गटात दोन असोसिएट संघांसह टीम राहणार. एका सत्रानंतर अव्वल गटात तळाला असलेली टीम दुसऱ्या गटात फेकली जाणार, तर दुसऱ्या गटातील अव्वल टीम पहिल्या गटात खेळणार.
प्रस्ताव पास करण्यासाठी मतांची गरज होती


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एक चतुर्थांश सामन्यांसाठी इंग्लंडला तिप्पट पैसे का ?
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी इंग्लंडला मिळणाऱ्या १३.५ कोटी डॉलर (जवळपास ८९५ कोटी रुपये) या रकमेवरही आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने म्हटले की, या वर्षी टी-२० वर्ल्डकपच्या ५८ सामन्यांच्या (पुरुष आणि महिला मिळून) आयोजनासाठी ४.५ कोटी डॉलर (२९८ कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली, तर इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या केवळ १५ सामन्यांसाठी ८९५ कोटी रुपये देण्यात आले. भारतात झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप सामन्यांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामन्यांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी आहे, हे विशेष.

पुढील स्लाइडवर वाचा, गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न
बातम्या आणखी आहेत...