आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कॅप्टनशिप करणार हा पंजाबी मुंडा, जगतो अशी LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरकीरत सिंह मान... - Divya Marathi
गुरकीरत सिंह मान...
स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि ऑस्ट्रेलियातील वनडे सिरीज 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. वनडे सिरीजपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ बोर्ड प्रेसिडेंट्स इलेवनच्या संघाविरुद्ध एक वार्म-अप मॅच खेळणार आहे. त्याच्या कर्णधार पदाची जबाबदारी गुरकीरत सिंह मान याला देण्यात आली आहे. पंजाबच्या मुक्तसर येथे राहणारा गुरकीरत डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. तसेच इंडिया ए टीमचा तो नियमित सदस्य आहे. त्याने टीम इंडियासाठी 3 वनडे सामने सुद्धा खेळले आहेत. 
 

कोण आहे गुरकीरत..?
- गुरकीरतचा जन्म 29 जून 1990 रोजी मुक्तसर येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव रुपिंदर सिंह मान आहे. ते पंजाब मंडी बोर्डात नोकरी करतात. गुरकिरतला एक बहिण देखील आहे.
- एका इंटरव्यूमध्ये गुरकीरत सांगितले होते, की 9 वर्षांचा असताना तो दररोज स्थानिक मैदानावर खेळाडूंना प्रॅक्टीस करताना पाहण्यासाठी जात होता. त्यांना पाहूणच आपणही प्रशिक्षण घ्यावे असे वाटले आणि क्रिकेटची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली. 
- गुरकीरतने आपला फर्स्ट क्लास करिअरमध्ये 34 सामने खेळत 2140 धावा केल्या तसेच 37 विकेट्स पटकावले आहेत. 
- लिस्ट ए करिअरमध्ये गुरकीरतने 63 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 2099 धावा काढल्या आहेत. यासोबतच त्याने टी-20 करिअरमध्ये 69 सामने खेळले. यात 1009 धावा काढून 6 विकेट्स पटकावल्या आहेत. 
 

इंडिया ए टीमचा धडाकेबाज फलंदाज
- 2014 मध्ये तिहेरी सिरीजच्या फायनलमध्ये त्याने इंडिया ए टीममध्ये खेळताना 81 बॉलवर 87 धावा काढून नावलौकिक मिळवले होते.
- ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या फायनल मॅचमध्ये 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत इडिया टीम ए च्या 82 धावांवरच 4 बळी गेले होते. मात्र, यानंतर बॅटिंगवर उतरलेल्या गुरकीरतने धडाकेबाज फलंदाजी करत विजय मिळवून दिला होता. 
- गुरकीरत 2011 मध्ये सर्वप्रथम सर्वांच्या नजरेत आला होता. त्यावेळी त्यानवे पंजाब अंडर-22 टीमसोबत सीके नायडू ट्रॉफी जिंकली होती. 
 

असा आहे IPL करिअर
- गुरकीरतने 2012 मध्ये किंग्स इलेवन पंजाब संघात खेळताना IPL डेब्यू केला होता. 30 सामन्यांत 16.28 च्या सरासरीसह त्याने 342 धावा काढल्या आहेत. तसेच 5 विकेट्स सुद्धा घेतल्या.
- IPL 2012 मध्येच आपला दुसरा सामना खेळताना त्याने 12 बॉलमध्ये 29 धावा काढल्या तसेच टीमला डेक्कन चार्जर्स विरोधात लास्ट बॉलवर विजय मिळवून दिला होता. 
- IPL 2013 मध्ये त्याने पुणे वॉरियर्सच्या रॉस टेलरचा कॅच घेतला होता. तो कॅच त्या टूर्नामेंटचा सर्वात लोकप्रीय कॅच ठरला होता. 
- 2014 च्या IPL पूर्वी KXIP ने त्याला सोडले. मात्र, लिलावात त्याच संघाने गुरकीरतला 1.3 कोटी रुपयांत विकत घेतले. तेव्हापासून तो त्याच संघात आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज, स्टायलिश लाइफ...
बातम्या आणखी आहेत...