आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही संघांना विजयाची समान संधी; भारताला हव्यात विकेट, तर ऑस्ट्रेलियाला 100 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- अॅलनबॉर्डर फील्ड ब्रिस्बेन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेला पहिला डे-नाइट कसोटी सामना तिसऱ्या दिवशी रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. भारत संघ दुसऱ्या डावात अवघ्या १५६ धावांत गारद झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य मिळाले.

आता अखेरच्या दिवशी भारत संघाला विजयासाठी विकेटची तर ऑस्ट्रेलिया संघाला १०० धावांची गरज आहे. दोन्ही संघांना सामन्यात विजयाची समान संधी आहे.

पहिल्या डावात अवघ्या धावांची आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताने सकाळी बाद ४४ धावांवरून पुढे सुरुवात केली. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आजचा दिवस गाजवला. त्यांनी भारताला मोठा स्कोअर उभा करू दिला नाही. संपूर्ण दौऱ्यात शानदार फॉर्मात असलेला मनीष पांडे केवळ ११ धावा काढून बाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर २६, करुण नायर २१ आणि कर्णधार नमन ओझा शून्य धावा काढून बाद झाले. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या केवळ धावा काढून चालता झाला. भारत संघाचा स्कोअर एकवेळ बाद १२० धावा असा होता. तेव्हा जयंत यादवने उपयुक्त अशी ४६ धावांची खेळी करून भारत संघाचा स्कोअर १५० च्या पुढे पोहोचवला.
विजयासाठी १५९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जो. बर्न्स केवळ ११ धावा काढून शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर बाद झाला. पुढच्या चेंडूवर ठाकूरने ट्रेव्हिस डीनला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतवले. कर्णधार पीअर हॅँड्सकोबने वेगवान २४ धावा काढल्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी ऑस्ट्रेलिया संघाने बाद ५९ धावा काढल्या. अाता सामना रोमांचक स्थितीत आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत: २३०आणि १५६. ऑस्ट्रेलिया: २२८आणि बाद ५९ धावा.
बातम्या आणखी आहेत...