आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉटेलात थांबणार टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया; आतून आहे असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेल रेडिसन ब्लू शहरातील पंचताराीकिंत हॉटेल आहे. - Divya Marathi
हॉटेल रेडिसन ब्लू शहरातील पंचताराीकिंत हॉटेल आहे.
स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजची पहिली लढत झारखंडच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर रंगणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या पहिल्या सामन्यासाठी तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. 4 ऑक्टोबर रोजी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ झारखंडच्या राजधानीत पोहोचणार आहेत. दोन्ही संघांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेल रेडिसन ब्लू येथे करण्यात आली आहे. सुरक्षेचा विचार करताना त्यांच्यासाठी हे हॉटेल निवडण्यात आले असे सांगितले जात आहे.
 

>> मॅचसाठी तिकीटांची विक्री 3 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. सकाळी 10 वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी खिडकीवर गर्दी केली. 900 ते 5000 रुपये असे त्यांचे दर आहेत. ही विक्री 5 ऑक्टोबरपर्यंतच राहणार आहे. 
 
>> दोन्ही संघांचे खेळाडू, कोच, डायटीशिअन, फिजिओ आणि इतरांसाठी शहरातील लग्जरी हॉटेलांपैकी एक रेडिसन ब्लू हॉटेल बुक करण्यात आले आहे.
 
>> हे हॉटेल 75 वर्षांच्या हॉस्पिटॅलिटीचा अनुभव असलेल्या कार्लसन रेजिडोर हॉटेल समूहाचे आहे. 

>> रांची रेल्वे स्टेशनपासून एका किमी अंतरावर आणि बिरसा मुंडा विमानतळावरून 6 किमी दूर हे हॉटेल आहे. 

>> या हॉटेलात हेल्थ क्लब, स्काय स्पा, सलून, बार, लाइव्ह म्यूजिक बार इत्यादी सुविधा आहेत. 

>> हॉटेलात सर्वच सदस्यांसाठी चविष्ट आणि त्यांच्या डायटनुसार, हवे तसे जेवण दिले जाणार आहे. 

>> यात कूल आणि हॉट असे दोन्ही स्वीमिंग पूल आहेत.  उल्लेखनीय बाब म्हणजे, मूळचा झारखंडचा असलेला धोनी आधीच शहरात पोहोचला आहे. धोनीसह स्पोर्टिंग स्टाफ देखील शहरात दाखल झाला. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आतून असे आहे हे लग्जरी हॉटेल...
बातम्या आणखी आहेत...