आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India And Pakistan Cricket Series To Be Held In Sri Lanka

श्रीलंकेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होण्याची शक्यता, 27 नोव्हेंबरला घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान डिसेंबरमध्‍ये होणा-या क्रिकेट मालिकेची घोषणा 27 नोव्हेंबर रोजी होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही देश श्रीलंकेत क्रिकेट खेळू शकतात. यात पाच एक दिवसीय सामने आणि दोन टी-20 सामन्यांचा समावेश असू शकतो. हवामानाचा विचार करता सामने श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडीमध्‍ये होण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्‍ये तू तू, मैं मैं :
यापूर्वी क्रिकेट मालिका युएईमध्‍ये होणार होती. मात्र फिक्सिंगच्या शंकेमुळे भारताने येथे खेळायला नकार दिला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)पाकिस्तानला भारतात खेळण्‍याचे आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी)ने भारतात येऊन मालिक खेळायला नकार दिला होता.
बीसीसीआयने पर्याय सूचवला :
यानंतर काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्‍यक्ष शशांक मनोहर यांनी सामन्यांबाबत झालेल्या बैठकीत दोन देशांतील क्रिकेट मालिका बांगलादेश किंवा भारतात खेळण्‍याचा पर्याय ठेवला होता.