आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘करवा चौथ’मुळे BCCI ने सामना एक दिवस पुढे ढकलला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘करवा चौथ’मुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फिराेजशहा कोटलाच्या मैदानावर होणार मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना १९ आॅक्टोबरच्या जागी आता २० ऑक्टोबरला घेण्याचे ठरवले आहे. हा सामना १९ ऑक्टोबर रोजी नियोजित होता. आता ही लढत एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि डीडीसीएचे उपाध्यक्ष सी.के.खन्ना यांनी या वृत्ताला दुजोरा देताना बीसीसीआयने आपली िवनंती मान्य केल्याचे सांगितले. याबाबत खन्ना म्हणाले, ‘आम्ही या सामन्याला एक दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली होती. बीसीसीआयने ही विनंती मान्य केल्याने आम्ही आभारी आहोत. मला कार्यालयात ही विनंती मान्य झाल्याचे पत्र मिळाले आहे.’ डीडीसीएने बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना पत्र लिहून विनंती केली की, १९ ऑक्टोबर रोजी करवा चौथ आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या संख्येने साजरा केला जातो. यामुळे १९ ऑक्टोबर रोजी सामना आयोजित केल्यास येणाऱ्या संभाव्य अडचणी सांगितल्या. करवा चौथमुळे सामन्याच्या तिकीट विक्रीवरही परिणाम पडू शकतो, असे डीडीसीएने सांगितले. यानंतर बीसीआयने ही विनंती मान्य केली.
बातम्या आणखी आहेत...