आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताने चौथे स्थान मिळवले असून सध्या पाचव्या स्थानी असलेला इंग्लंड संघ आॅस्ट्रेिलयाविरुद्ध घरच्या अॅशेस कसोटी मालिकेद्वारे आशियातील बलाढ्य संघाला मागे टाकण्याचा प्रयत्न करू शकतो. बुधवारी कार्डीफ येथे मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड व आॅस्ट्रेलियामध्ये प्रतिष्ठेचा चषक जिंकून क्रमवारीत वर सरकण्यासाठी चढाओढ राहणार आहे.
इंग्लंड ९७ गुणांसह पाचव्या स्थानावर असून भारतापेक्षा काही गुणांनी माघारला आहे. तसेच अगदी सूताच्या फरकाने पाकिस्तानच्या पुढे आहे. कांगारू मात्र १११ गुणांसह दुस-या स्थानी विराजमान आहे. त्यांना क्रमवारीत हवे अव्वल सिंहासन. इंग्लंडने मालिका ३-० फरकाने जिंकली तर त्यांना क्रमवारीत दुसरे स्थान मिळू शकते, मात्र आॅस्ट्रेिलयाने पाचही सामने जिंकले तर कुकचा संघ सातव्या स्थानापर्यंत गडगडेल.

अव्वल १० फलंदाजांमध्ये एकमेव विराट
अव्वल कसोटी फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत एकमेव भारतीय फलंदाज म्हणून विराट कोहली १० व्या स्थानी आहे. मात्र कसोटी खेळणा-या गोलंदजाला अग्रणी १० गोलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेची स्टेनगन नावाने प्रसिद्ध डेल स्टेन गेल्या काही मोसमांपासून अधिराज्य गाजवतोय.