आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SL : भारताचा तिसरा फलंदाज तंबूत, विराट कोहली आऊट, पावसाचे सावट कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता : भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज तीन कसोटी सामन्याच्या सीरिजला चार तास उशीरा झाली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला. मैदान ओले असल्याने सामना निर्धारित वेळेपेक्षा चार तास उशीरा सुरु झाला. 

 

भारतीय संघाची फलंदाजी...

- भारताने प्रथम फलंदाजी करीत 8.2 षटकांत 2 विकेटसह 17 धावा केल्या. 

- त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला. 

- सामना थांबविण्यात आला तेव्हा चेतेश्वर पुजारा (8) आणि विराट कोहली (0) धावांवर खेळत होता. 

- सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर विराट कोहली शून्य धावांवर आऊट झाला. 

श्रीलंकेला हरवून परफेक्ट 10 मध्ये पोहोचण्याची संधी आहे. विराट ब्रिगेटने श्रीलंकेला यावर्षी त्यांच्याच मैदानात नऊ सामन्यात हरविलेले आहे. श्रीलंकेच्या संघाला भारताविरोधात एकदाही त्यांच्याच मैदानात आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

 

पावसामुळे रद्द करावा लागला सराव, पुढील दोन दिवसा पावसाची शक्यता

- कोलकातामध्ये बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही संघांना सराव रद्द करावा लागला. त्यामुळे संपूर्ण मैदान झाकून ठेवावे लागले. 
- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तीन वेगवान, एक स्पिनर गोलंदाजासह भारताचा संघ मैदानात
- भारत-श्रीलंका कसोटीसाठी ईडन गार्डनमध्ये हिरवे पिच तयार करण्यात आले आहे. वेगवान पिचमुळे दोन्ही टीममध्ये गोलंदाजीत बदल करण्यात आलेले आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने याबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, भारतीय संघ तीन वेगवान, एक स्पिनर गोलंदाजसह मैदानात उतरेल. 

 

कसोटी सीरिजसाठी आठ वर्षांनी श्रीलंका भारतात
- श्रीलंकेची टीम कसोटी सीरिजसाठी तब्बल आठ वर्षांनी भारतात आलेली आहे. 2009 मध्ये श्रीलंकेची टीम भारतात आली तेव्हा विराट कोहलीने संघात प्रवेशही केला नव्हता.
- श्रीलंकेच्या सध्याच्या संघात एंजेलो मॅथ्यूज आणि रंगना हेराथ या दोघांनीच भारतीय मैदानावर क्रिकेट खेळलेले आहे.

 

अश्विन आणि राहुलला जागतिक विक्रमाची संधी
- अश्विन आणि राहुलकडे जागतिक विक्रम उभारण्याची संधी आहे. आतापर्यंत अश्विनने 52 कसोटी सामन्यात 292 विकेट पटकावल्या आहेत. त्यांच्याकडे वेगाने 300 विकेट पटाकवण्याची संधी आहे. 
- सध्या हा रेकॉर्ड डेनिस लिली याच्या नावे आहे. केएल राहुलकडे आठ अर्धशतकांचा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. आतापर्यंत संयुक्त रेकॉर्ड राहुल, एवर्टन विक्स, अँडी फ्लॉवर, चंद्रपॉल, संघकाराद आणि क्रिस रोजर्स यांच्या नावावर आहे.

 

भारताच्या रॅकिंगमध्ये काहीही फरक नाही
- भारत-श्रीलंका सीरिजमुळे भारताच्या कसोटी श्रेणीत कुठलाही फरक पडणार नाही. सध्या भारत 125 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवल्यास दोन गुणांची भर पडेल. भारत तिन्ही सामने हरल्यासही रँकिंग कायम राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...