आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज हरलो तर मालिका गमावणार; मालिकेत बांगलादेशची १-० ने अाघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर- पहिल्या वनडेत यजमान बांगलादेशला दुबळे लेखून गाफील राहणाऱ्या टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरताना धोनी ब्रिगेड दुसऱ्या वनडेसाठी सज्ज झाली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

पहिल्या पराभवामुळे टीम इंडिया प्रचंड दबावात आली आहे. दुसरीकडे यजमान बांगलादेशचा संघ तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने पुढे अाहे. पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे यजमान खेळाडूंचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. दुसरा सामनाही जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने रविवारी यजमान संघाचे खेळाडू मैदानावर उतरतील.
यजमान बांगलादेशच्या टीमने मालिकेतील पहिल्या वनडेत भारतीय संघाला ७९ धावांच्या मोठ्या अंतराने नमवले होते. काही महिन्यांपूर्वीच वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांगलादेशला पराभूत केले होते. त्या पराभवाचा हिशेब यजमान संघाने चुकता केला. जागतिक क्रिकेटमध्ये पुरेसा परिपक्व न झालेला दुबळा संघ म्हणून बांगलादेशकडे पाहिले जाते. मात्र, या दुबळ्या संघाने पहिल्या वनडेत धोनी ब्रिगेडला पराभूत सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय संघाला अपेक्षेपेक्षा यजमान संघ अधिक मजबूत निघाल्याने टीम इंडियाच्याही अडचणी वाढल्या आहेत. याच बांगलादेश संघाने काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानला घरच्या मैदानावर वनडे मालिकेत ३-० ने पराभूत केले होते, हे विशेष. अाता दुसऱ्या वनडेत दाेन्ही संघांत चुरस रंगेल.