आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदुरात विजयाच्या सिक्सरसह टीम इंडिया क्रमवारीत नंबर 1; 28 सप्टेंबरला चाैथा वनडे सामना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर-तिसऱ्या वनडेत भारताने आॅस्ट्रेलियाला ५ गड्यांनी हरवून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-०ने विजयी आघाडी घेतली. रोहित शर्मा (७१), अजिंक्य रहाणे (७०) आणि हार्दिक पांड्याच्या (७८) खेळींच्या जोरावर भारताने २९४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ४७.५ षटकांत गाठले. या विजयासह टीम इंडिया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये दक्षिण अाफ्रिकेला मागे टाकून पहिल्या स्थानी पोहोचली आहे. कसोटीत आधीच टीम इंडिया पहिल्या स्थानी आहे. टी-२० मध्ये पाचव्या स्थानी आहे. होळकर स्टेडियममध्ये भारताने विजयाचा षटकारही खेचला. याआधी भारत येथे ४ वनडे व एक कसोटी जिंकलेली आहे.  युवा फलंदाज मनीष पांडे (नाबाद ३६) अाणि महेंंद्र सिंग धाेनीने (नाबाद ३)  संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. 
 
सलामीवीर अजिंक्य रहाणे (७०) अाणि राेहित शर्माने (७१) शतकी भागीदारी रचून भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला हाेता. त्यानंतर धाेनी अाणि मनीष पांडेने विजय निश्चित केला. हा भारताचा सलग तिसरा विजय ठरला. या पराभवामुळे पाहुण्या अाॅस्ट्रेलियावर मालिका गमावण्याची नामुष्की अाेढावली. अाता चाैथा वनडे सामना २८ सप्टेंबर राेजी बंगळुरूच्या मैदानावर हाेणार अाहे. 
 
 फिंच (१२४) व स्मिथच्या (६३) भागीदारीच्या बळावर अाॅस्ट्रेलियाने  भारतासमाेर  २९४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेेते. प्रत्युत्तरात भारताने ५ गड्यांच्या माेबदल्यात ४७.५ षटकांत सामना जिंकला. रहाणे व राेहित शर्माच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने सामना जिंकला.
इंदुरात सलग पाचवा विजय : भारताने इंदूरात सलग पाचवा विजय मिळवला. हा भारताचा विक्रम ठरला. 
 
कुलदीप, बुमराह चमकले
भारताच्या चायना मॅन कुलदीपने गत सामन्यातील अापली धारदार गाेलंदाजीची लय कायम ठेवली. यासह त्याने दाेन विकेट घेऊन अाॅस्ट्रेलियन टीला माेठा धक्का दिला. त्याने दीड शतकी भागीदारी रचणाऱ्या फिंच व स्मिथला बाद केले. तसेच जसप्रीत बुमराहने १० षटकात ५२ धावा देताना दाेन गडी बाद केले.
 
राेहितचे कांगारूविरुद्ध सर्वाधिक षटकार 
भारताच्या सलामीवीर राेहित शर्माने तुफानी फटकेबाजी करताना अर्धशतक ठाेकले. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे ७१ धावांची खेळी केली. यासह रोहित शर्माने अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ६५ षटकार अापल्या नावे केले.
 
कांगारूवर चाैथा मालिका विजय 
जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाने पाहुण्या अाॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली. हा भारताचा अाॅस्ट्रेेलियावरचा चाैथा मालिका विजय ठरला. यापूर्वीही भारताने अापल्या घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियावर मालिका विजयाची नाेंद केली अाहे.  यासह भारताने प्रतिस्पर्धी अाॅस्ट्रेलियाच्या कामगिरीची बराेबरी साधली. या दाेन्ही संघांच्या नावे अाता प्रत्येकी चार मालिका विजयाची नाेंद झाली अाहे. 
 
फिंचचे शतक व्यर्थ 
अाॅस्ट्रेलियाकडून अॅराेन फिंचने झंझावाती खेळी केली. त्याने १२५ चेंडूंचा सामना करताना १२ चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे १२४ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने वाॅर्नर अाणि कर्णधार स्मिथसाेबत अर्धशतकी भागीदारीही केली.
बातम्या आणखी आहेत...