आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे चोख प्रत्युत्तर!, भारताच्या दिवसअखेर ४ बाद ३१९ धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकाेट - मुरली विजय (१२६) व चेतेश्वर पुजाराने (१२४) द्विशतकी भागीदारीच्या बळावर शुक्रवारी पहिल्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंड संघाला चाेख प्रत्युत्तर दिले. या भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद ३१९ धावांची खेळी केली. भारताला शेवटच्या काही वेळात चार चेंडूंमध्ये दाेन विकेट गमवाव्या लागल्या. इंग्लंडने पहिल्या डावात ५३७ धावांचा डाेंगर रचून यजमानांवर दबाव निर्माण केला हाेता. मात्र, भारताने तिनशे धावांचा पल्ला पार करून अापले स्थान मजबूत केले अाहे. टीम इंडियाचा कसाेटी कर्णधार विराट काेहली नाबाद २६ धावांवर खेळत अाहे. अमित मिश्रा (०) अाल्यापावलीच तंबूत परतला.

भारताने कालच्या बिनबाद ६३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. अापल्या धावसंख्येत एकाची भर टाकून गाैतम गंभीरने (२९) सकाळच्या पहिल्याच सत्रात तंबू गाठला. त्याला ब्राॅडने पायचीत करून टीम इंडियाला पहिला जबर धक्का दिला. मात्र, त्यानंतर चेतेश्वर पुजाराने सलामीच्या मुरली विजयसाेबत पाहुण्या टीमच्या गाेलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

भारताला दिवसाच्या शेवटच्या काही वेळात माेठा फटका बसला. अवघ्या चार चेंडूंमध्ये भारताला दाेन विकेट गमवाव्या लागल्या.

इंग्लंडकडून गंभीरची खिल्ली :
झटपट बाद झालेल्या गाैतम गंभीरची इंग्लंडच्या खेळाडूंनी खिल्ली उडवली. ब्राॅडने गंभीरला पायचीत केले. या निर्णयावर शंका असल्याने त्याने डीअारएसचा अाधार घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, मुरलीने बाद असल्याचे सांगितल्यावर गंभीर बाहेर निघाला. दरम्यान खेळाडूंनी हसून गंभीरची टर उडवण्याचा प्रयत्न केला.

मुरली-पुजाराची २०९ धावांची भागीदारी
मुरली विजय अाणि चेतेश्वर पुजारा या दाेघांनीही संयमी खेळी करताना दुसऱ्या गड्यासाठी २०९ धावांची भागीदारी रचली. या दाेघांची वैयक्तिक शतकी खेळी हीच कसाेटीत दिवसभराचे खास अाकर्षण ठरले. पुजाराने अापल्या कसाेटी करिअरमध्ये सातवे शतक ठाेकले. त्याने २०६ चेंडूंचा सामना करताना १७ चाैकारांच्या अाधारे १२४ धावा काढल्या. मात्र, बेन स्टाेक्सने ही जाेडी फाेडली. त्याने पुजाराला बाद केले. मुरलीने ३०१ चेंडूंमध्ये ९ चाैकार अाणि ४ षटकारांसह १२६ धावा काढल्या.

पुजाराच्या नावाचा जयजयकार
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन चेतेश्वर पुजाराने संघाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. त्याने मुरलीला माेलाची साथ दिली. शतक पूर्ण करताच चाहत्यांनी पुजाराच्या नावाचा जयजयकार केला. या वेळी त्याचे वडील व पत्नीदेखील उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...