आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी मुंबई संघात रोहितचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- न्यूझीलंडविरुद्ध येत्या १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या सराव सामन्यासाठी मुंबई संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मुंबई संघ आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली खेळेल. मुंबई संघात अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आलेला नाही. मुंबई संघात अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

मुंबई संघ असा
आदित्य तारे (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, कौस्तुभ पवार, जय बिस्त, सुफियान शेख, अरमान जाफर, परीक्षित वेलसेंगकर, विशाल दाभोळकर, विजय गोहिल, बलविंदरसिंग संधू ज्यू., तुषार देशपांडे, रोस्टन डायस, हर्षल सोनी.
बातम्या आणखी आहेत...