आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता टी-२० चे आव्हान, पहिला टी-२० सामना आज रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- वनडे क्रिकेट मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्ध दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेतही विजय मिळवण्याच्या लक्ष्याने टीम इंडिया शुक्रवारी मैदानावर उतरेल. दोन्ही संघांत मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी होत आहे. वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे.
तिन्ही वनडे भारताने जिंकले असले, तरीही या लढतीत यजमान झिम्बाब्वेने चांगली झुंज दिली. पहिला वनडे भारताने अवघ्या ४ धावांनी जिंकला होता. यामुळे टी-२० मालिकेत यजमान संघाचे आव्हान कमी लेखता येणार नाही. झिम्बाब्वेच्या तुलनेत भारतीय क्रिकेटपटूंना टी-२० खेळण्याचे अनुभव अधिक असल्याने याचा फायदा भारताला निश्चित होईल. वनडेनंतर आता टी-२० मध्येही आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान कर्णधार अजिंक्य रहाणेपुढे असेल. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत निवड समितीने युवा अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले होते.
वनडे मालिकेत अंबाती रायडू मालिकावीर ठरला होता. ताे आता टी-२० मालिकेत दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याची उणीव निश्चितपणे भारतीय संघाला जाणवेल. त्याच्या जागी टीम इंडियात सामील करण्यात आलेल्या संजू सॅमसनला टी-२० मध्ये संधी मिळू शकते.
भारताला क्षेत्ररक्षणात सुधारणेची गरज आहे. वनडेत मालिकेत अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण झाले नाही. स्लिपमध्ये झेल सोडल्या गेले. टी-२० मध्ये एखादा महत्वाचा सोडलेला झेलही निर्णायक ठरू शकतो.

भारतीय संघ आहे मजबूत
{ टीम इंडिया यजमान झिम्बाब्वेच्या तुलनेत मजबूत आहे. भारताची फलंदाजीची फळी तगडी आहे.
{ भारतीय फलंदाजीची मदार कर्णधार अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, केदार जाधव, मनीष पांडे, संजू सॅमसन, मुरली विजय यांच्यावर असेल.
{ भारतीय गोलंदाजीची मदार भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अक्षर पटेल, हरभजनसिंग यांच्यावर असेल.
{ केदार जाधवने तिसऱ्या वनडेत शतक, तर मनीष पांडेने अर्धशतक ठोकून आपला फॉर्म सिद्ध केला होता.

झिम्बाब्वे आहे मजबूत
{ यजमान झिम्बाब्वेकडे अष्टपैलू चिभाभा, कर्णधार िचगुम्बुरा, हॅमिल्टन मसकदजा असे दमदार खेळाडू आहेत. हे तिघेही सामन्याचे चित्र बदलू शकतात.
{ झिम्बाब्वेची गोलंदाजीही चांगलीच मजबूत आहे. घरच्या मैदानावर ते अधिक घातक ठरतात.

विजयच्या जागी सॅमसन
या लढतीत मुरली विजयच्या जागी टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज संजू सॅमसनला अंितम अकरा खेळाडूंत संधी मिळू शकते. सॅमसन आक्रमक फलंदाजी करतो. दुसरीकडे मुरली विजय संथ फलंदाजी करतो. रहाणेसह उथप्पा सलामीला खेळू शकतो.
बातम्या आणखी आहेत...