आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-झिम्बाब्वे दुसरा वनडे; आज जिंकलो तर मालिका विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- पहिल्या वनडेत मिळालेल्या ९ विकेटच्या विजयानंतर उत्साहित टीम इंडिया सोमवारी यजमान झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या वनडेत खेळेल. दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया या सामन्यात खेळेल. मागच्या सामन्यात भारताची बाजू उजवी होती. भारताने २०१३ मध्ये ५-० ने तर २०१५ मध्ये ३-० ने मालिका जिंकून झिम्बाब्वेला व्हाइटवॉश दिला होता.

पहिल्या वनडेत भारताच्या युवा ब्रिगेडने चांगली फलंदाजी करताना दमदार गोलंदाजीही केली होती. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या होत्या. धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. फिरकीपटूंत अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. सर्व गोलंदाजांनी चांगल्या इकॉनामी रेटने गोलंदाजी केली होती. हे प्रदर्शन पुन्हा करण्याची आशा संघ व्यवस्थापनाला असेल. झिम्बाब्वेच्या प्रदर्शनात सातत्याची कमी आहे.
बातम्या आणखी आहेत...