आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs AUS वनडे :भारताने नंबर वनचे स्थान गमावले; बंगळुरूमध्ये 14 वर्षांनंतर पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- टीम इंडियाला गुरुवारी अाघाडीच्या तीन गाेलंदाजांना एकाच वेळी विश्रांती देण्याची माेठी किंमत चुकवावी लागली. यामुळे भारताने  वनडे क्रमवारीतील नंबर वनचे सिंहासन गमवले. रिचर्डसन (३/५८) व नॅथन कुल्टर-नाइलने (२/५६)  धारदार गाेलंदाजी करताना चाैथ्या वनडेत अाॅस्ट्रेलियाला शानदार विजय मिळवून दिला. मालिका पराभवातून सावरलेल्या अाॅस्ट्रेलियाने शानदार कमबॅक करताना भारतावर २१ धावांनी मात केली. यासह अाॅस्ट्रेलियाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडले. 

सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर (१२४) अाणि अॅराेन फिंचने (९४) सामन्यात भुवनेश्वर, बुमराह अाणि कुलदीपच्या अनुपस्थितीत युवा गाेलंदाजीला फाेडून काढताना विक्रमी द्विशतकी भागीदारी रचली. यातून अाॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३३५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने अाठ गडी गमावून ३१३ धावांपर्यंत मजल मारली. रहाणे (५३), राेहित (६५) व केदारची (६७) खेळी व्यर्थ ठरली. 

नंबर वन गमावले
बंगळुरूतील पराभवाने भारताच्या सलग विजयाच्या माेहिमेला ब्रेक लागला. याशिवाय भारताने वनडेतील नंबर वनचे स्थानही गमावले. द. अाफ्रिकेने अव्वल स्थान गाठले. गत सामन्यातील विजयाने टीम इंडिया नंबर वन झाली हाेती. अाता भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. अाॅस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर अाहे.

१४ वर्षांनंतर बंगळुरूत पराभव
भारताने तब्बल १४ वर्षांनंतर बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर वनडे सामना गमावला. २००३ नंतर भारताला वनडेत पराभवाचा सामना करावा लागला. अाॅस्ट्रेलियाविरुद्ध या मैदानावरचा मागील सात सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला. 
काेहलीचा विक्रम हुकला : टीम इंडियाला सलग नऊ वनडेत विजय मिळवून देत विक्रम करण्याचा काेहलीचा प्रयत्न अपयशी ठरला. अाठ वनडेतील विजयासह काेहलीने धाेनीशी साधलेली बराेबरी कायम अाहे.
 
वाॅर्नर-फिंचची विक्रमी भागीदारी 
सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने अॅराेन फिंचसाेबत विक्रमी भागीदारीचा पल्ला गाठला. त्यांनी यजमानांच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना संघाला २३१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यामध्ये वाॅर्नरने शतकाचे याेगदान दिले.   
 
वॉर्नर पहिला शतकवीर 
करिअरमधील १०० व्या शतकामध्ये शतक ठाेकणारा डेव्हिड वाॅर्नर हा पहिला अाॅस्ट्रेलियन फलंदाज ठरला. तसेच डेव्हिड वाॅर्नर हा जगातील अाठवा फलंदाज ठरला अाहे.  त्याने ११९ चेंडूंचा सामना करताना १२ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे १२४ धावांची खेळी केली.  त्याने गुरुवारी बंगळुरूच्या मैदानावर या अनाेख्या कामगिरीची नाेंद केली. याशिवाय १०० वा वनडे खेळणारा ताे दुसरा अाॅस्ट्रेलियन फलंदाज अाहे. यापूर्वी गत अाठवड्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथने (१०२) वनडेचे शतक ठाेकले.
 
उमेेश यादवचा बळींचा चाैकार 
भारताकडून  उमेश यादवने बळींचा चाैकार मारला. त्याने १० षटकांत ७१ धावा देताना हे यश संपादन केले. याशिवाय त्याने वनडेतील १०० विकेटही पूर्ण केल्या. अाता त्याच्या नावे १०२ विकेटची नाेंद झाली. त्याने स्मिथला बाद केल्यानंतर  विकेटचे शतक साजरे केले.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, विराटकडे नवा रेकॉर्ड बनवण्याची संधी...
बातम्या आणखी आहेत...