आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मौज-मस्तीसह खेळाडू करताहेत प्रॅक्टिस, साहाने धोनीबाबत केली कमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडीज दौ-यावर जात आहे. त्यासाठी सध्या बंगळुरूमध्ये टीम इंडियाचे प्रॅक्टिस सेशन सुरु आहे. जेथे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियातील खेळाडू जोरदार घाम गाळत आहेत. दरम्यान, या प्रॅक्टिसदरम्यान खेळाडूंनी कधी कसून सराव केला तर कधी हसत-खेळत मौजमस्ती केली. कुंबळे सरांनी भारतीय संघातील शिलेदारांना योगा करण्यासही भाग पाडले.
यादरम्यान, यष्टीरक्षणाची तयारी करीत असलेला विकेटकीपर रिद्धिमान साहाने म्हटले आहे की, महेंद्रसिंह धोनीची जागा भरून काढणे खूपच अवघड बाब आहे. मी माझ्यापरीने सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करेन. रिद्धिमानने हे मत शुक्रवारी प्रॅक्टिस सेशननंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अजून काय म्हणाला साहा...
- धोनीसोबत तुलना केल्यानंतर साहा म्हणाला, 'धोनी भाई रिटायरमेंट झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी मला संधी मिळाली आहे. मात्र, त्याची जागा सहजासहजी भरता येणार नाही.
- साहा म्हणाला की, 'धोनी भाईने मागील काही वर्षे सर्वोत्तम योगदान दिले आहे. संघाला विजयी करण्यासाठी त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
- वैयक्तिक कामगिरीबाबत बोलताना साहा म्हणाला, मला माझी संघातील जागा कायम ठेवण्यासाठी विकेटकीपिंगसह चांगली फलंदाजीही करावी लागेल. मी गेली काही वर्षे भारतीय संघाबरोबर राहिलो आहे. माझे ध्येय असेल की मी सर्वोत्तम कामगिरी करीत संघाला विजय मिळवून देणे.
- यानंतर तो म्हणाला, प्रथम संघाचे हित मगच वैयक्तिक कामगिरीला महत्त्व आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, प्रॅक्टिस सेशनदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूचा अंदाज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...