आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया झिम्बाब्वे दौ-यासाठी रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युवा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीन वनडे आणि दोन टी-२० सामने खेळण्यासाठी मंगळवारी झिम्बाब्वेला रवाना झाली आहे. रहाणे पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करेल.

दोन्ही देशांत हरारे येथे १० जुलै रोजी पहिला वनडे सामना होईल. नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौ-यातील दुस-या वनडेत रहाणेने संघाबाहेर बसवल्याच्या निर्णयाबद्दल, भारतीय उपखंडाच्या खेळपट्टीवर रहाणेला स्ट्राइक रोटेट करण्यात अडचण येते, असे धोनीने म्हटले होते. धोनीच्या या मताला खोडून काढताना बीसीसीआयने रहाणेच्या हाती नेतृत्व सोपवले. तिकडे झिम्बाब्वे संघही लयीत आहे.

भारतीय संघ असा
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजनसिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.