आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकर ते अनिल कुंबळे, या FAB-5 च्या हातात आहे टीम इंडियाचे भविष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताचा माजी कसोटी कर्णधार आणि विश्वविख्यात लेगस्पिनर अनिल कुंबळे याची भारतीय क्रिकेट संघाच्या पूर्णवेळ प्रशिक्षकपदी आगामी एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. टीमच्या बॅटिंग-बॉलिंग-फील्डिंग कोचच्या नावांची घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येईल, असे बीसीसीआय म्हटले आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी धर्मशाला येथे ही घोषणा केली. एकूण 57 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 21 जणांची प्राथमिक निवड करून त्यांना आपापली गुणवत्ता, उपयुक्तता आणि योग्यता सिद्ध करण्याची संधी दिली होती. अखेर कुंबळेच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

फॅब-5 अर्थात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हातात भारतीय संघाचे भविष्य आहे. हे पाचही माजी क्रिकेटपटूंनी एकूण 2370 इंटरनॅशनल (टेस्ट+वनडे) सामने खेळले होते.

FAB-5 बाबत काय म्हणाला कुंबळे...?
''हे ग्रेट ऑनर आहेत. सल्लागार समितीचा सदस्य असलेले सचिन, सौरव व लक्ष्मणसोबत मी दीर्घकाळ मैदानावर खेळलो आहे. राहुल द्रविड टीमचा कोच होता. आम्ही पाचही जण भारतीय क्रिकेटसाठी काही तरी करत असल्याचा अभिमान आहे.' अशी प्रतिक्रिया अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर दिली.

जाणून घ्या मागील वर्षभरातील टीम इंडियाचा रिपोर्ट कार्ड...
- टी-20 : 23 सामने, 16 विजय, 7 पराभव
- वनडे :17 सामने, 10 विजय, 7 पराभव
- टेस्ट :7 सामने, 5 विजय, 1 पराभव, 1 अनिर्णित (ड्रॉ)

सध्याचे रँकिंग
- टेस्ट :110 रेटिंगसोबत 4th पोझिशनवर
- ODI :112 रेटिंगसोबत 2nd पोझिशनवर
- टी- 20 :128 रेटिंगसोबत 2nd पोझिशनवर

हे आहे टीम इंडियाचे वर्षभराचे शेड्यूल...
- टीम इंडिया यंदा घरच्या मैदानावर 13 टेस्ट, 8 वनडे व 3 टी-20 सामने खेळणार आहे.
- वेस्ट इंडीजमध्ये 4 टेस्ट खेळून मायदेशी परतणार
- 23 सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मालिका
- टीम इंडिया एकूण 17 टेस्ट, 11 वनडे व 6 टी-20 मॅच खेळणार आहे.
- टीम एका सीझनमध्ये पहिल्यांदा 17 टेस्ट खेळणार आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, इंडियन क्रिकेट टीमला नेक्स्ट लेव्हलवर नेण्यासाठी फॅब-5ची काय असेल भूमिका...
बातम्या आणखी आहेत...