आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहराच्या फेअरवेलनिमीत्त टीम इंडियाने केली अशी धम्माल, डान्स करतांना दिसले खेळाडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - आशीष नेहराने बुधवारी न्यूझीलंड विरोधात झालेल्या टी 20 सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. या सामन्यासह नेहराच्या 18 वर्षाच्या करीअरला पूर्णविराम मिळाला. हा सामना दणदणीत धावांनी जिंकून नेहराला शानदार अलविदा टीम इंडियाने केले. नेहराच्या फेअरवेलनिमीत्त टीम इंडिया मोठ्या उत्साहात बघायला मिळाली.
 
सामन्यात असा राहिला नेहराचा परफॉर्मन्स
- सामन्याचा पहिले आणि शेवटचे षटक आशीष नेहराने टाकले. नेहराचे चार षटकांत 29 धावा न्यूझीलंड संघाला दिल्या. मात्र एकही विकेट मिळाली नाही.
- दोनवेळा सीमारेषेजवळ टीम इंडियाने नेहराच्या षटकांत न्यूझीलंडचे झेल सोडले. त्यामुळे दोन विकेट मिळता मिळता राहिल्या.
- आशीष नेहराच्या चेंडूवर हार्दिक पंड्याने तिसऱ्या षटकात कोलिन मुनरो याचा झेल सोडला. तेव्हा मुनरो अवघ्या पाच धावांवर खेळत होता.
- त्यानंतर आठव्या षटकांत विराटने नेहराच्या चेंडूवर विलियम्सनचा झेल सोडला. तेव्हा विलियम्सन 21 धावांवर खेळत होता.
 
फेअरवेलला विराटने केला डान्स
- भारतीय संघासाठी नेहराने दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सामन्याच्या सुरुवातीला सुरुवात झाली. त्यानंतर एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. 
- याव्यतरिक्त सामना संपल्यानंतर नेहराने टीमच्या खेळाडूंसह मैदानाला फेरी मारली. यादरम्यान नेहरा सर्वात पुढे चालत होता. चालता चालता प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन करीत होता. यादरम्यान विराट आणि शिखर धवनने नेहराला खांद्यावर बसवून स्टेडियममध्ये नेले. 
- टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी नेहराचा समारोप अविस्मरणीय ठरण्यासाठी फोटोही काढले.
- हा सामना पाहण्यासाठी नेहराची पत्नी रुश्मा, मुले आणि नातेवाईकही आले होते.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा - आशीष नेहराच्या फेअरवेलचे फोटो
बातम्या आणखी आहेत...