आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजसह या 5 स्टार भारतीय क्रिकेटर्सचे टीममध्ये कमबॅक आता कठिणच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - एकेकाळी रेकॉर्डवर रेकॉर्ड करणारा युवराज सिंह देशाच्या 74 टॉप क्रिकेटर्सच्या यादीत सुद्धा नाही. अशात युवराजचे क्रिकेट करिअर संपुष्टात आले की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससह देशांतर्गत खेळाडू सुद्धा त्याला पिछाडीवर टाकत आहेत. 36 वर्षांच्या युवराज सिंहने वेस्ट इंडीज विरुद्ध जून 2017 मध्ये शेवटची टेस्ट मॅच खेळली. यात वाइट परफॉर्मंस दिल्याने त्याला संघातून बाहेर करण्यात आले. सध्या त्याची निवड दलीप ट्रॉफी किंवा ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रॅक्टिस मॅचसाठी देखील झालेली नाही. त्यामुळे, त्याचा भारतीय संघात कमबॅक नाहीच असे म्हटले जात आहे.
 

- जानेवारी 2017 मध्ये टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघाचा कॅप्टन होताच विराटने युवराज सिंहला भारतीय संघात परत आणले होते. युवराज तत्पूर्वी 3 वर्षे संघाच्या बाहेरच होता. 
- या वर्षी युवराजने 11 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी एका मॅचमध्ये 150 स्कोर केला. तरीही सर्वच 11 सामन्यांचा एकूण स्कोर फक्त 372 एवढा आहे. 
- 11 सामन्यांत युवराजचा एव्हरेज 41 आणि स्ट्राइक रेट जवळपास 99 आहे. मात्र, गेल्या 2 सिरीज (चॅम्पियंस ट्रॉफी आणि वेस्ट इंडीज टूर) मध्ये तो फ्लॉप ठरला.
- चॅम्पियंस ट्रॉफीच्या 5 सामन्यांत त्याने केवळ 105 धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या विरुद्ध खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांत त्याने 57 धावा केल्या.
- यानंतर श्रीलंका दौऱ्यासाठी टीमची निवड झाली, तेव्हा युवराजला बाहेर काढण्यात आले. यासाठी युवराजच्या खराब फिटनेसला कारणीभूत ठरवले जात आहे.
- जगातील सर्वात फिट क्रिकेटर्सपैकी एक विराट कोहली आपल्या टीममेटच्या फिटनेसबद्दल तडजोड करण्यास तयार नाही. फिटनेस आणि परफॉर्मंस लक्षात घेता, त्याचे टीममध्ये परतणे शक्य वाटत नाही. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा... या क्रिकेटर्सचे भारतीय संघात परतणे कठिण...
बातम्या आणखी आहेत...