आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंड विरुद्ध नेहराचा अखेरचा सामना, ट्वीटरवर आल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टी 20 सीरीजच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी हरविले. भारतीय वेगवान गोलंदाज आशीष नेहराचा समारोपाचा सामना होता. या सामन्यासह नेहराने 18 वर्षाच्या क्रिकेट करीअरला अलविदा केले. टीमचा विजय आणि नेहराच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स आल्या. 
 
फॅन्स म्हणाले तुझी आठवण येईल...
- 38 वर्षीय नेहराने आंतरराष्ट्रीय करीअरमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेट फॉर्मटमध्ये एकूण 164 सामने खेळले. त्याशिवाय एकूण 235 विकेट्स पटकावल्या.
- 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलेल्या नेहराला सात कॅप्टनसोबत खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, धोनी आणि विराट कोहलीचा समावेश आहे. 
- आपल्या करीअरमध्ये नेहराने 17 कसोटी, 120 एकदिवसीय आणि टी 20 चे 27 सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे 44, 107 आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत.
- क्रिकेट फॅन्सने नेहराला निरोप देतांना सोशल मीडियावर असंख्य कमेंट्स केल्या. यापैकी काही खूप गमतीशीर होत्या.
 
असा होता सामन्यातील रोमांच
- न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी करण्यास सांगितले. भारताने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करीत 3 गडी बाद होऊन 202 धावांचा डोंगर उभारला.
- टॉस हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानावर आले. दोघांनीही धडाकेबाज फलंदाजी करीत पहिल्या विकेटपर्यंत 98 चेंडूत भारताने 158 धावा खेचल्या होत्या.
- न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी सुमार प्रदर्शन करत शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलींचे झेल सोडले. या तिन्ही जीवदानाची मोठी किंमत न्यूझीलंडला चुकवावी लागली.
- कीवीच्या टीमध्ये ईश सोढीने भारताचे दोन गडी बाद केले. दुसरीकडे कोलिन मुनरो, ग्रँडहोम आणि बोल्ट महागडे ठरले.
- धावांचा पाठलाग करतांना न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत वाईट झाली. सुरुवातीलाच थोड्या फरकाने विकेट्स पडल्या. 
- न्यूझीलंडच्या संघाने 20 षटकांत 149 धावा केल्या. या मोबदल्यात 8 गडी भारताने बाद केले. त्यामुळे भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला.
- सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या शिखर धवनला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात आले. सीरीजमधील दुसरा सामना 4 नोव्हेंबरला राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - ट्वीटवर आशीष नेहरासाठी आलेल्या गमतीशीर कमेंट्स
बातम्या आणखी आहेत...