आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरा आज होणार निवृत्त: सर्वात जास्त काळ खेळलेला इंडियन बॉलर, पाहिले 7 कॅप्टन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय संघातील सर्वात सीनिअर खेळाडू आणि फास्ट बॉलर आशीष नेहरा बुधवारी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवटचा सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध बुधवारचा टी-20 सामना आपल्या करिअरचा शेवटचा सामना राहणार हे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. शेवटचा सामना खेळूनही तो सर्वाधिक सामने खेळणारा भारताचा आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरणार आहे. 
 
एकूण 6826 दिवसांचे क्रिकेट करिअर...
> नेहराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात 18 वर्षे, 8 महीने आणि 9 दिवस अर्थातच 6826 दिवस होते. त्याने माजी स्पिनर एस व्यंकटराघवनचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याचा करिअर 6784 दिवसांचा होता. तिसऱ्या स्थानावर अनिल कुंबळे आहे. अनिल कुंबळेचे करिअर 6767 दिवस होते. 
> भारतीय बॉलर्स वगळता एकूणच भारतीय क्रिकेटर्सचा विचार केल्यास सचिनचे करिअर सर्वात दीर्घकाळ 8760 दिवस इतके होते. यानंतर लाला अमरनाथ (6935 दिवस) यांचा क्रमांक लागतो. 
> हरभजन सिंग नेहराचा विक्रम मोडू शकतो. भज्जीच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात होऊन 17 वर्षे 348 दिवस झाले आहेत. त्याने शेवटचा सामना 3 मार्च 2016 रोजी खेळला होता. मात्र, हरभजनला पुन्हा खेळण्याची संधी मिळेल का हा एक प्रश्नच आहे. 

2016 वर्ल्डकप पर्यंत वाररले जुने नोकिया फोन
टी-20 वर्ल्ड कप 2016 दरम्यान आशिष नेहराने सांगितले होते, "मी आजही आपला जुना नोकिया फोन वापरतो. फोनच्या केवळ मला दोनच गोष्टी कळतात हिरवा बटन फोन रिसीव्ह करतो आणि लाल बटन कॉल बंद करतो. मी फेसबूक आणि ट्विटरपासून दूर आहे. एवढेच नव्हे, तर मी दैनिक देखील वाचत नाही." यानंतर ट्विटरवर लोकांनी त्याला ट्रोल केले होते. आणि काही दिवसांनंतर त्याने आयफोन विकत घेऊन व्हॉट्सअॅप वापरणे शिकले. 

विराट, सहवाग आणि युवराजचे आवडते 'नेहराजी'
- सीनियर खेळाडू नेहरा अतिशय साध्या स्वभावाचा आहे. इतर खेळाडू त्याला नेहराजी या नावाने बोलावतात. विराट आणि युवराज सिंहचा तो फेव्हरेट आहे. युवराजच्या मते, नेहरा टीममध्ये सर्वात कंजूश आणि सर्वांचा आवडता आहे.
- तर दुसरीकडे, कॉमेंट्री करताना सहवाग नेहमीच मुद्दाम नेहराचा उल्लेख नेहराजी असे करतो. त्याला टीम इंडियातील सर्वात सीनियर खेळाडू संबोधत त्याची टिंगल काढत असतो.
बातम्या आणखी आहेत...