आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-AUS: शेवटचा वनडे सामना आज, भारताकडे पुन्हा नंबर 1 होण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजचा शेवटचा सामना नागपुरातील विदर्भ क्रिकेट मैदानावर रविवारी खेळला जाणार आहे. टीम इंडियाने सिरीजमध्ये आधीच 3-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शेवटचा वनडे जिंकून ऑस्ट्रेलियाला सर्वात वाइट आठवणींसह पाठवणे हे भारताचे लक्ष्य राहील. तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना जिंकून भारताला नंबर एकचे स्थान मिळवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. 
 

भारतासाठी सर्वात मोठी संधी...
- सीरीजमध्ये 3-1 अशी आघाडी घेतलेला भारतीय संघ शेवटचा सामना जिंकत असल्यास प्रथमच एखाद्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 4-1 अशी आघाडी घेणार आहे. 
- या सिरीजपूर्वी भारत-ऑस्ट्रेलियात 7 वेळा 5 सामन्यांच्या सिरीज आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये भारताने दोन वेळा कांगारुंना 3-2 अशी मात दिली. 
- भारताने 7 वेळा झालेल्या 5 वनडे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियास दोन वेळा पराभूत केले. यात पहिली सिरीज 1986 आणि दुसरी सिरीज 2013 मध्ये जिंकल्याची नोंद आहे. 
- शेवटचा वनडे सामना जिंकून भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा बदला देखील घेऊ शकतो. गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने भारताला 4-1 ने पराभूत केले होते. 
 
 
पुन्हा नंबर एक होण्याची संधी
- 24 सप्टेंबर रोजी इंदूरात झालेला सामना जिंकून भारत आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट क्रमवारीत नंबर एकचा संघ बनला होता. मात्र, बेंगळुरू सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आला. 
- ICC वनडे रँकिंगमध्ये सध्या दक्षिण आफ्रीका 119 रेटिंग पॉइंट्ससह नंबर एक पोजिशनवर आहे. टीम इंडिया तेवढ्याच पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
- टीम इंडियाने शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास 120 रेटिंग पॉइंट्ससह पुन्हा नंबर एकचा संघ होणार आहे. 
- ऑस्ट्रेलियाच्या संघाने नागपूर वनडे जिंकल्यास 116 अंकांसह तो तिसऱ्या क्रमांकाचा संघ आहे त्याच तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, देशांतर्गत रेकॉर्ड्स व इतर माहिती...
बातम्या आणखी आहेत...