आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD : विराट कोहलीची 2017मध्ये झाली 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, सचिन-धोनीच्या रांगेत समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 2017 या वर्षात 100 कोटींच्या विशेष क्लबमध्ये पोहोचला आहे. विराटने क्रीडा साहित्य बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीसोबत तब्बल 110 कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार 8 वर्षांसाठी केला असून त्याला ठरलेल्या रकमेसह कंपनीच्या व्यवसाय वृद्धीनुसार रॉयल्टीही मिळणार आहे. या कंपनीच्या ब्रँडचा ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून कोहली आता जमैकाचा युसैन बोल्ट, आसाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिएरे हेन्री आणि ऑलिव्हर गिरॉड यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
 
सचिन, धोनीसह आता कोहली : भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसुद्धा बऱ्याच वर्षांचा करार करून 100 कोटींच्या क्लबमध्ये आधीच सामील आहेत. त्यांनी स्पोर्ट्स आणि टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीसोबत करार केला होता. क्रिकेटमधील 24 वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये सचिनने 50 ब्रँडसाठी जाहिराती केल्या आणि 500 कोटींची डील केली होती. सचिनने 1995 मध्ये वर्ल्डटेलसोबत 30 कोटींचा करार केला.
 
 
बातम्या आणखी आहेत...