आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL च्या प्रत्येक बॉलवर 25 लाख, अशा प्रकारे 3710 कोटी कमवणार BCCI

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटचा जबरदस्त फॉरमॅट इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएलमध्ये बीसीसीआय प्रत्येक बॉलवर 25 लाख रुपयांची कमाई करणार आहे. होय, आयपीएलचे मीडिया राइट्स यावेळी 4 पट वाढीव किमतीवर विकल्याने बीसीसीआयच्या कमाईचे गणितच बदलले आहे. आता 47 दिवस चालणाऱ्या टी-20 लीग सामन्यांमध्ये जेवढी कमाई होईल, ती वर्षभर इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये होणाऱ्या एकूण कमाईपेक्षा 4 पट जास्त राहणार आहे. 
 

दरवर्षी 3710 कोटी कमवणार बीसीसीआय...
- स्टार इंडियाने सोमवारी झालेल्या आयपीएलच्या लिलावात 5 वर्षांसाठी 16,347 कोटी रुपयांत मीडिया राइट्स विकत घेतले आहेत. तत्पूर्वी आयपीएलचे स्पॉन्सरशिप राइट्स चिनी मोबाइल कंपनीने 2,199 कोटी रुपयांत 5 वर्षांसाठी विकत घेतले आहेत. दोन्ही राइट्समधून होणाऱ्या कमाइचा वार्षिक हिशोब काढल्यास बीसीसीआयला 3710 रुपये दरवर्षी मिळणार आहेत. 
- भारतात होणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया राइट्समधून बीसीसीआयला वार्षिक 642 कोटी रुपये मिळतील. तर, स्पॉनसरशिप राइट्समधून 215 कोटी मिळणार आहेत. एकूणच बीसीसीआयला इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांतून 857 कोटी रुपये मिळणार आहेत. या तुलनेत आयपीएलची 47 दिवसांची कमाई 4.32 पटीने अधिक आहे. 
- या व्यतीरिक्त इतर सोर्सेसकडून बोर्डाला 1601 कोटी रुपये येतात. सर्वच खर्च कापून बोर्डाची वार्षिक कमाई 2.5 हजार कोटींच्या घरात होणार अशी अपेक्षा आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आयपीएलच्या 1 ओव्हरमध्ये किती कमाई करणार बीसीसीआय तसेच इतर देशांच्या क्रिकेट लीग्सची कमाई
बातम्या आणखी आहेत...