आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलदीप-चहल यांचा गमतीशीर Interview, केले असले खुलासे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरोधात वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांच्या परफॉर्मंसवर दुर्लक्ष करता येणार नाही. भारताच्या मालिका विजयात या तिघांचा मोठा हातभार होता. हे तिघे एका ठिकाणी मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले आहेत. बीसीसीआयने नुकताच आपल्या साइटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित आपले सहकारी चहल आणि यादव यांची गंमतीशीर मुलाखत घेताना दिसून आला. रोहितच्या भन्नाट प्रश्नांवर या दोघांची उत्तरे तेवढीच मजेदार होती. 
 

>> मुलाखतींच्या सुरुवातीलाच रोहितने आपल्या सहकाऱ्यांना विचारले की ते क्रिकेटच्या बाहेर काय करतात. 

>> पुढे रोहित विचारतो, "तुमच्या दोघांचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. महिला फॅन्सला तुम्ही कसे हॅन्डल करता?"

>> चहल म्हणाला, "तसं मी खूप बोलत राहतो. पण, पोरींना पाहून माझ्या गळ्यातून आवाज निघत नाही. माझ्यासोबत 3-4 वेळा हा प्रकार घडला आहे. एखाद्या मुलीला मी 5-6 वर्षांपासून ओळखत असेल तर ठीक, नाही तर नवीन कुणी आल्या की मी स्माइल करून निघून जातो." 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहितचे असे प्रश्न आणि त्या दोघांची उत्तरे...
बातम्या आणखी आहेत...