आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्मा आऊट झाल्यावर झाली गफलत, थर्ड अंपायरही झाले होते कन्फ्यूज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-न्यूझीलंड सामन्यात रोहित शर्मा आऊट झाल्यावर कन्फ्यूजन झाले होते. - Divya Marathi
भारत-न्यूझीलंड सामन्यात रोहित शर्मा आऊट झाल्यावर कन्फ्यूजन झाले होते.
स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान बुधवारी दिल्ली मैदानावर पहिला टी 20 सामना खेळण्यात आला. हा सामना भारताने तब्बल 53 धावांनी जिंकला. या सामन्यात ओपनिंग फलंदाज रोहित शर्माने शानदार फलंदाजी करीत 80 धावा संघासाठी उभारल्या. अखेरीस 19 वे षटक सुरु असतांना रोहित आऊट झाल्याबद्दल सर्वांमध्ये गफलत झाली. ज्यामुळे थर्ड अंपायरची दोनवेळा मदत घ्यावी लागली.
 
असा झाला रोहित शर्मा आऊट झाल्याचा निर्णय...
- इनिंगच्या 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने ट्रेंड बोल्टच्या यॉर्कर बॉलवर फटकारा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू थेट विकेट कीपर टॉम लॅथमकडे गेला. 
- रोहितच्या फटकाऱ्यानंतर एक आवाज आला. ज्यानंतर गोलंदाजाने विकेटसाठी जोरदार अपील केली. यावेळी अंपायर नितिन मेनन यांनी लेग अंपायर शमसुद्दीन यांच्याशी चर्चा केली.
- दोन्ही अंपायरमध्ये झालेल्या कन्फ्यूजनमुळे त्यांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. थर्ड अंपायर अनिल चौधरी यांनी रोहितला नॉट आऊट सांगितले. 
कीवी टीमने निर्णयासाठी केली DRS ची मागणी
- थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर कीवी टीमचे समाधान झाले नाही. त्यानंतर DRS ची मागणी करण्यात आली.
- त्यानुसार थर्ड अंपायरने आढावा घेऊन रोहितला आऊट झाल्याचे सांगितले. यासाठी अल्ट्रा एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
- रोहित शर्माने 55 चेंडूत 80 धावा काढल्या. यामध्ये सहा चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा - अशाप्रकारे आऊट झाला रोहित शर्मा 
बातम्या आणखी आहेत...