आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलरची हिंदीने प्रभावित झालेल्या सेहवागने UIDAIला विचारले, 'आधारकार्ड तयार करून मिळेल का?', मिळाले हे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचे स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि कीवी क्रिकेटर रॉस टेलरदरम्यान सोशल मीडियावर सुरु असलेल्या गंमतीजमतीने वेगळे वळण घेतले. राजकोट येथील दुसरा टी 20 सामना संपल्यानंतर रॉस टेलरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत रॉस टेलरने असे काही लिहिले की, टेलरचे आधारकार्ड तयार होऊ शकते?
 
टेलरने केला इन्स्टाग्रामवर फोटो शेअर
- शनिवारी राजकोट मैदानावर भारत आणि न्यूझीलंड विरूद्धचा सामना संपला. त्यानंतर रॉस टेलरने एक फोटो शेअर केला. या फोटोत बंद असलेल्या एका टेलरच्या दुकानाबाहेर रॉस टेलर बसलेला आहे. 
- या फोटोच्या कॅप्शनमध्ये टेलरने लिहिले की, वीरेंद्र सेहवाग राजकोट सामन्यानंतर टेलरची दुकान बंद झाली. पुढील शिलाई त्रिवेंद्रम येथे होईल. जरुर यावे. #India #IndvNZ
- टेलरची ही पोस्ट वाचल्यानंतर सेहवागने टेलरच्या हिंदीचे कौतुक केले. त्यावर कमेंट करतांना UIDAIला उद्देशून सेहवागने लिहिले की, काय रॉस टेलरचे आधारकार्ड तयार होऊ शकते का?
 
सेहवागला मिळाले हे उत्तर
- UIDAIला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सेहवागला लगेचच मिळाले. ऑथरीटीने ट्वीटवरूनच सेहवागला सांगितले की, भाषेची काहीही अडचण नाही. तुमच्या अॅड्रेस प्रुफवर तुमचे आधारकार्ड तयार होत असते.
- सेहवागला ऑथरीटीच्या उत्तराची अपेक्षा नव्हती. कारण, सेहवागने ही कमेंट गमतीत केली होती.
- त्यानंतर सेहवागने ट्वीट केले की, कोणी कितीही गंमत करो, शेवट सरकारवरच होतो.
 
पुढील स्लाईडवर वाचा - वीरेंद्र सेहवागने केलेले ट्वीट
बातम्या आणखी आहेत...