आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा खेळाडू आहे युवराज सिंहचा प्रेरणास्थान, या कारणामुळे गांगुली नेहराला म्हणायचा पोपट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंहने नेहरासाठी भावनिक पत्र लिहीले आहे. - Divya Marathi
युवराज सिंहने नेहरासाठी भावनिक पत्र लिहीले आहे.
स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंडच्या पहिल्या टी 20 सामन्यानंतर भारतीय गोलंदाज आशीष नेहराने निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर युवराज सिंहने आशीष नेहरासाठी एक भावनिक पत्र लिहिले. हे पत्र फेसबुकवर शेअर करीत नेहरा माझे प्रेरणास्थान असल्याचेही म्हटले आहे. युवीने या पत्रात नेहरासोबत झालेल्या पहिल्या मुलाखतीबद्दल आणि त्यांच्या गंमतीशीर स्वभावाबद्दल बरेच काही या पत्रात लिहिले आहे.
 
असे आहे युवीने नेहराला लिहिलेले पत्र...
आशीष नेहराबद्दल पहिले ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रामाणिकपणा. तो अत्यंत स्वच्छ मनाचा व्यक्ती आहे. कदाचित एखादा धार्मिक ग्रंथच त्याच्यापेक्षा स्वच्छ असेल. माझ्यासाठी आशीष हा नेहराजी किंवा आशू आहे. नेहराचे व्यक्तीमत्व अत्यंत गंमतीशीर प्रकारातील आहे. मी पहिल्यांदा जेव्हा आशीष नेहराला भेटलो तेव्हा आम्ही अंडर 19 टीममध्ये खेळत होतो. नेहराजींनी हरभजनसिंह यांच्यासोबत रूम शेअर केली होती. मी जेव्हा भज्जींना भेटण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेलो. तेव्हा उंच आणि काटक शरीरयष्टीचा मुलगा दिसला. जो न हालता एका जागेवर थोडही शांत थांबू शकत नव्हता. ज्याप्रमाणे एखाद्या मांजरीला तापलेल्या टेरेसवर सोडल्यावर हालचाली असतील, अगदी त्याच पद्धतीची हालचाल नेहरांची होती. काही क्षणांपुरते नेहरा शांत बसतील, त्यानंतर लगेचच काहीतरी करण्यात मग्न होईल. पहिल्यांदा नेहराजींना पाहिले तेव्हा मी हसू थांबवू शकलो नाही. असे वाटत होते जसे काही त्यांच्या पँटमध्ये मुंग्या सोडलेल्या आहेत. नंतर मला समजले की नेहराजी असेच आहे.
 
आशीषला गांगुली म्हणायचे पोपट...
- युवराजच्या मते, सौरव गांगुली आशीषला खूप बोलक्या स्वभावामुळे प्रेमाने पोपट नावाने हाक मारायचे. असे वाटायचे की नेहरा पाण्यातही बोलू शकतो. तुमच्या सोबत आशीष नेहरा असेल तर तुम्हाला कंटाळवाणे वाटणार नाही. ते तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसवतील. मी नेहराला कधीही सांगितले नाही, की मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतलीय. कारण, आशीष नेहरावर वेगवेगळ्या प्रकारच्या 11 सर्जरी झालेल्या आहेत. तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. तर मी सुद्धा 38 व्या वर्षी खेळू शकतो. 2003च्या वर्ल्डकप दरम्यान नेहराजींचा टाचेला जखम झाली होती. मात्र त्यांनी जखमांकडे दुर्लक्ष करून खेळी कायम ठेवली. त्यांनी 72 तासांत किमान 30 ते 40 वेळा आयिसंग, टॅपिंग आणि पेन किलर्स खाल्ल्या. इंग्लंड विरुद्ध खेळणे अशक्य वाटत असतांनाच आशीषजी खेळण्यास सज्ज झाले. त्या सामन्यात नेहराजींनी 23 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट पटकावल्या. हा सामना भारताने 82 धावांनी जिंकला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा - PHOTOS
बातम्या आणखी आहेत...