आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका विरोधात T-20 सिरीजही खेळणार नाही विराट, टीम इंडियामध्ये 4 नवे चेहरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंका विरोधात एकदिवसीय मालिकेनंतर 20-20 सिरीज सुद्धा खेळली जाणार आहे. 20 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. वनडेनंतर टी-20 मध्ये सुद्धा विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर, स्पिनर अक्षर पटेलला बाहेर ठेवण्यात आले आहे. 

 

हे आहेत नवीन चेहरे...
> टी-20 सिरीजसाठी वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, बासिल थम्पी आणि जयदेव उनादकट यांना समाविष्ट करण्यात आले आहे. या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी-20 खेळण्याची ही पहिलीच वेळ राहणार आहे. 

 

अक्षर पटेल बाहेर, जडेजा-अश्विनलाही संधी नाही
> टीम इंडियातून अक्षर पटेलला बाहेर करण्यात आले आहे. त्याने शेवटचा टी-20 सामना 4 नोव्हेंबर 2017 रोजी राजकोट येथे खेळला होता. त्या सिरीजमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या होत्या.
> टेस्टमध्ये इंडियाचा स्टार स्पिनर राहिलेला रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनाही टी-20 संघात परतीची संधी मिळाली नाही. दोघांनी 9 जुलै रोजी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. 

 

असा आहे टी-20 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी आणि जयदेव उनादकट.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नवीन खेळाडूंचे करिअर आणि प्रदर्शन...

बातम्या आणखी आहेत...