आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ओव्हरने बदलला संपूर्ण खेळ, जिंकत असलेली मॅच अशी हरला पाकिस्तान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड इलेवनच्या टीमने दुसरा टी-20 सामना 7 गडी राखून जिंकला. मॅचमध्ये पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 6 विकेट्स गमवून 174 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना 19.5 ओव्हर्सध्ये वर्ल्ड इलेवनने पाकला पराभूत केले. रोमहर्षक सामन्यात पाकिस्तान विजयाच्या दिशेने जात होता. मात्र, एका ओव्हरने अख्खी मॅच फिरवली. 
 
 
असा होता सामना
- मॅचमध्ये वर्ल्ड इलेवनच्या इनिंगच्या वेळी 18 ओव्हर पर्यंत पाकिस्तानचा संघ विजयी होणार असे प्रत्येकाला वाटत होते. त्यावेळी वर्ल्ड इलेवनला विजयासाठी 12 बॉल्समध्ये 33 धावा हव्या होत्या. 
- सोहेल खानचे 19 वे षटक खऱ्या अर्थाने पाकिस्तानसाठी घातक ठरले. याच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या हातात आलेली मॅच निघून गेली. एकाच ओव्हरमध्ये सोहेलने वर्ल्ड इलेवनला तब्बल 20 धावा दिल्या. 
 

शेवटच्या ओव्हरमध्ये परेराने मिळवून दिला विजय
- 20 व्या ओव्हरमध्ये वर्ल्ड इलेवनला विजयासाठी 13 धावा हव्या होत्या. हे लक्ष्य अवघ्या 5 चेंडूंमध्ये साध्य झाले. 
- थिसारा परेराने शेवटच्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर षटकार लावून टीमला विजय मिळवून दिला. 
- परेराने 19 बॉलमध्ये नाबाद 47 धावा, तर हाशिम आमलाने सुद्धा 55 बॉलमध्ये नाबाद 72 धावांची खेळी केली. 
- मॅचमध्ये सिक्सर लावून विजय मिळवून देणाऱ्या थिसारा परेराला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...