आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षात विराटने गाठला सचिनचा निम्मा विक्रम, या गतीने खेळल्यास जाऊ शकतो सचिनच्याही पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - सचिन तेंडुलकरने रिटायरमेंटच्या वेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा विक्रम तोडू शकतात. आता वाटतेय की, सचिनचे वक्तव्य खरे करण्याचे ध्येय विराटने ठेवले आहे. नऊ वर्षाच्या करिअरमध्ये विराटने सचिनचा निम्मा विक्रम गाठलेला आहे. सचिनने 40 व्या वर्षी रिटायरमेंट स्वीकारली. तोपर्यंत विराट खेळल्यास या गतीने सचिनचा रेकॉर्ड अगदी सहज गाठू शकतो.
 
सचिन तेंडुलकरचे करिअर 
फॉर्मट    मॅच      रन         सेन्चुरी     हाफ सेन्चुरी
टेस्ट      200      15921    51            68
वनडे     436      18426     49           96
टी20     1          10            0              0
टोटल    664    34357      100         164
 
विराट कोहलीचे करीअर
फॉर्मेट    मैच    रन        सेन्चुरी     हाफ सेन्चुरी
टेस्ट      60      4658      17           14
वनडे     202     9030      32           45
टी20    53        1878      0             17
टोटल    315    15566     49           76
 
29 व्या वर्षापर्यत सचिन खेळलाय विराटपेक्षा 64 सामने अधिक
प्लेयर/रिकॉर्ड         मॅच      रन         सेन्चुरी    हाफ सेन्चुरी
सचिन तेंडुलकर      379     18938    60           86
विराट कोहली         315     15566    49           76
 
सचिनच्या जागेची केली भरपाई
- सचिन कसोटी क्रिकेटमध्ये जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वश्रेष्ठ फलंदाज मानला जायचा. त्याच्या रिटायरमेंटनंतर विराटने कसोटीत 3287 धावा केल्या आहेत. या धावा जगातील अन्य कोणत्याही फलंदाजाच्या तुलनेत अधिक आहेत.
 
धावांचा पाठलाग करण्यात विराट पुढे
- सचिनने धावांचा पाठलाग करतांना एकदिवसीय सामन्यात 17 शतक लगावले आहेत. विराटने सचिनपेक्षा निम्मे सामने कमी खेळूनही सचिनपेक्षा दोन शतक अधिक केले आहेत.
 
मॅच एंड सीरीज अवार्ड
- सचिनला आतापर्यंत 76 मॅन ऑफ द मॅच, तर 20 वेळा मॅन ऑफ द सीरीजचा अवार्ड मिळालेला आहे.
- विराटला आतापर्यंत 40 वेळा मॅन ऑफ द मॅच, तर 11 वेळा मॅन ऑफ द सीरीजचा अवार्ड मिळालेला आहे.
 
कॅप्टन म्हणून विराट पुढे 
सचिन : 25 कसोटी सामन्यात चार विजय, नऊवेळा पराभूत. 72 एकदिवसीय सामन्यात कप्तान राहिला. त्यापैकी 23 सामने जिंकले. सात सामन्यांचे निकाल लागले नाहीत. 
विराट : 29 कसोटी सामन्यापैकी 19 विजयी, 3 पराभूत. 7 सामने अनिर्णीत राहिले. 43 एकदिवसीय सामन्यापैकी 33 विजयी, 9 पराभूत आणि 1 सामना अनिर्णीत राहिला.
 
पुढील स्लाईडवर वाचा - सचिनएवढे खेळल्यास विराट करू शकतो हे रेकॉर्ड
बातम्या आणखी आहेत...