आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर विराट, पण क्रमवारीत अजुनही 8 वा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - कोलकाता टेस्टमध्ये श्रीलंका विरोधात कॅप्टन विराट कोहलीने धडाकेबाज शतक ठोकले आहे. त्याने नाबाद 104 धावांची बॅटिंग केली आहे. यासोबतच विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचे 50 शतक देखील पूर्ण केले. त्याने वनडे इंटरनॅशनलमध्ये 32 सेंच्युरी लावल्या आहेत. सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत विराट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्या आहे. मात्र, टॉप-10 यादी पाहिल्यास तो अजुनही 8 व्या क्रमांकावर आहे. 

 

> सचिन तेंडुलकरच्या नावे 100 आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याचे विक्रम आहे. विराटची स्पीड आणि त्याचे वय पाहता तोच हा रेकॉर्ड मोडू शकतो असा दावा केला जात आहे. 
> 29 वर्षीय विराटने केवळ 9 वर्षांतच सचिनच्या अर्ध्या विक्रमापर्यंत पोहोचला आहे. याचवर्षी त्याने 9 शतक ठोकले आहेत. वर्षभरात त्याने केलेल्या सर्वाधिक सेंच्युरी आहेत. 
> विराटने 50 वे शतक आपल्या 348 व्या इनिंगमध्ये लावले आहे. असे करून त्याने हाशिम आमलाची बरोबरी केली. सचिनशी तुलना केल्यास सचिनला 50 शतक ठोकण्यासाठी 376 इनिंग्स (28 अधिक) खेळाव्या लागल्या होत्या. त्यामुळेच, विराटला क्रिकेटमध्ये सचिनचा उत्तराधिकारी म्हटले जात आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, टॉप-10 शतकबहाद्दर क्रिकेटर्सची संपूर्ण यादी...

बातम्या आणखी आहेत...