कराची - माजी कर्णधार अाणि दिग्गज फलंदाज इंझमाम-उल-हकची नुकतीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात अाली. अवघ्या ८ लाख दरमहा वेतनावर ही नियुक्ती करण्यात अाली. राष्ट्रीय टीमसाठी महत्त्वपूर्ण याेगदान देता यावे, यासाठी त्याने नुकतेच अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक पद साेडले. या ठिकाणी त्याला दरमहा १२ लाखांचे वेतन दिले जात हाेते. मागील अाॅक्टाेबर २०१५ पासून इंझमाम अफगाण टीमला काेचिंग करत हाेता. येत्या डिसेंबर २०१६ पर्यंतचा इंझमाम हा अफगाणिस्तान क्रिकेट मंडळासाेबत (एसीबी) करारबद्ध हाेता.