आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 2016 Gl Vs Rcb Virat Kohli Hits Maiden T20 Century At Rajkot

कोहलीचे शतक ठरले व्यर्थ; गुजरातचा बंगळुरूवर विजय, अव्वलस्थानी गुजरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या (१००*) शतकावर गुजरात लायन्सचा फलंदाज दिनेश कार्तिकचे (५०*) अर्धशतक वरचढ ठरले. रविवारी राजकोटच्या मैदानावर झालेल्या आयपीएलच्या सामन्यात कोहलीच्या शतकाच्या बळावर बंगळुरूने २० षटकांत २ बाद १८० धावांचा डोंगर उभा केला. मात्र, गुजरात लायन्सने कार्तिकच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ३ चेंडू ६ विकेट शिल्लक ठेवून विजय मिळवला.

या विजयासह गुजरात गुणतालिकेत टॉपवर पोहोचली आहे. गुजरातचे ५ सामन्यांत ८ गुण झाले अाहेत. बंगळुरूचा ५ सामन्यांत हा तिसरा पराभव ठरला. बंगळुरू ४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

विजयासाठी अावश्यक असलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून सलामीवीर ड्वेन स्मिथने २१ चेंडूंत २ षटकार, २ चौकारांसह ३२, तर ब्रेंडन मॅक्लुमने २४ चेंडूंत २ षटकार, ५ चौकारांसह ४२ धावा ठोकल्या. स्मिथ-मॅक्लुम यांनी ५.२ षटकांत ४७ धावांची सलामी दिली. यानंतर सुरेश रैनाने २४ चेंडूत २८ धावा काढल्या. दिनेश कार्तिकने प्रतिकूल परिस्थितीत चांगला खेळ करताना ३९ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ५० धावा काढल्या. कार्तिकने एक टोक सांभाळून खेळ केला. जडेजाने १० चेंडूंत १२ तर ब्राव्होने एका चेंडूत ४ धावा काढून विजयात योगदान दिले.

कोहलीचे टी-२० मध्ये पहिले शतक
तत्पूर्वी िवराट कोहलीने टी-२० मध्ये पहिले शतक साजरे करताना नाबाद १०० धावा ठोकल्या. कोहलीने ६३ चेंडूंत १ षटकार, ११ चौकारांसह ही खेळी केली. वॉटसनने ६, एबी डिव्हिलर्सने १६ चेंडूंत २० धावा काढल्या. बंगळुरूचा युवा फलंदाज लोकेश राहुलने अवघ्या ३५ चेंडूंत नाबाद ५१ धावा झोडपल्या. राहुलने ३ षटकार, ४ चौकार ठोकत ही खेळी साकारली. वॉटसनला धवल कुलकर्णीने तर ए.बी. डिव्हिलर्सला प्रवीण तांबेने बाद केले.

कोहलीच्या ३६७ धावा : कोहलीने या सत्रात ५ सामन्यांत सर्वाधिक ३६७ धावा ठोकल्या आहेत. सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत तो नंबर वन आहे. त्याने १ शतक, ३ अर्धशतकांसह या धावा जोडल्या.

आजचा सामना
मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब,
थेट प्रक्षेपण रा. ८.०० वाजेपासून

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धावा चेंडू ४ ६
कोहली नाबाद १०० ६३ ११ १
वॉटसन झे. जडेजा गो. धवल ०६ ०६ ०१ ०
डिव्हिलर्स झे. रैना गो. तांबे २० १६ ०२ ०
के.एल. राहुल नाबाद ५१ ३५ ०४ ३
अवांतर : ३. एकूण : २० षटकांत २ बाद १८० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-८, २-५९. गोलंदाजी : प्रवीणकुमार ३-०-२८-०, धवल कुलकर्णी ४-०-२९-१, प्रवीण तांबे ३-०-२४-१, जकाती ३-०-२८-०, रवींद्र जडेजा ३-०-१७०, ब्राव्हो ४-०-४३-०.
गुजरात लायन्स धावा चेंडू ४ ६
स्मिथ झे. एबी गो. रिचर्डसन ३२ २१ ०३ २
मॅक्लुम झे. व गो. शमसी ४२ २४ ०५ २
रैना झे. अब्दुल्ला गो. चहल २८ २४ ०३ ०
दिनेश कार्तिक नाबाद ५० ३९ ०३ ०
जडेजा झे. राहुल गो. वॉटसन १२ १० ०० १
ड्वेन ब्राव्हो नाबाद ०४ ०१ ०१ ०
अवांतर : १४. एकूण : १९.३ षटकांत ४ बाद १८२ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४७, २-८७, ३-१४०, ४-१७८. गोलंदाजी : यजुवेंद्र चहल ४-०-३३-१, रिचर्डसन ४-०-५३-१, इक्बाल अब्दुल्ला ४-०-४१-०, वॉटसन ३.३-०-३१-१, टी. शमसी ४-०-२१-१.

पुढील स्लाइडवर वाचा, पाच सामन्यांत विजयांसह गुजरात गुणतालिकेत अव्वलस्थानी...