आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 2016: HC Allows BCCI To Hold May 1 IPL Match In Pune

IPL 2016: उच्च न्यायालयाची पुण्यात १ मेच्या सामन्याला परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - क्रिकेट सामन्याच्या खेळपट्टीसाठी पाणी वापरण्यावरून वादात सापडलेला आयपीएल शृंखलेतील सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर घेण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे १ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि पुणे या संघांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

राज्यात दुष्काळी परिस्थिती व तीव्र पाणीटंचाई असताना राज्यातले सर्व सामने ३० एप्रिलनंतर बाहेर आयोजित करावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर बीसीसीआयने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. दुष्काळग्रस्तांना पाच कोटी रुपयांची मदत करण्याचे सांगितले होते. दोन्ही संघ प्रत्येकी पाच कोटी देतील, असेही बीसीसीआयने सांगितले होते. त्यावर १ मे रोजीचा सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
खेळाडूंच्या हितासाठी निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवण्यासाठीचे नियोजन बीसीसीआयने सुरू केले होते. परंतु पुण्यातील सामन्याबाबत खेळाडूंच्या विश्रांतीचा प्रश्न निर्माण होत होता. २९ एप्रिल रोजी पुण्यात गुजरात व पुणे असा सामना होणार आहे. सामना प्रकाशझोतातील असल्याने उशिरा संपणार आहे. लगेच १ मे रोजी पुण्याचा मुंबईशी सामना आहे. तो हलवला तर रातोरात प्रवास करत पुणे संघाला राज्याबाहेर सामना खेळणे भाग पडले असते. हा मुद्दा बीसीसीआयने न्यायालयात उपस्थित केला. तो न्यायालयाने अपवाद म्हणून मान्य केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रदिनी पुण्यात मुंबई-पुणे असा सामना रंगणार आहे.