आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 2016: Parthiv Rayudu Show Takes Mumbai Indians Past Kings XI Punjab

पार्थिव, अंबातीचे अर्धशतक; मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- जसप्रीत बुमराह (३/२६), मॅक्लिनघन (२/३२) व टीम साउथीच्या (२/२८) धारदार गाेलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स टीमने साेमवारी नवव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजय मिळवला. गतविजेत्या मुंबईने सामन्यात डेव्हिड मिलरच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा २५ धावांनी पराभव केला. यासह मुंबई टीमने पराभवाची मालिका खंडित करून स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नाेंद केली. पंजाब टीमचा हा पाचवा पराभव ठरला.

पार्थिव पटेल (८१) व अंबाती रायडूच्या (६५) अर्धशतकामुळे मुंबईने विजयासाठी पंजाबसमाेर १९० धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पंजाब टीमने ७ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. ग्लेन मॅक्सवेल (५६) व डेव्हिड मिलरची नाबाद ३० धावांची खेळी व्यर्थ ठरली.
तत्पूर्वी सलामीवीर पार्थिव पटेल (८१) आणि अंबाती रायडूने दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची शतकी भागीदारी केली. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर पार्थिव-रायडूने १४.१ षटकांत १३७ धावा जोडल्या. आयपीएलमध्ये एखाद्या संघाची पहिली विकेट शून्यावर पडल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. पार्थिवला बरेच जीवदान मिळाले. पार्थिवने ५८ चेंडूंत १० चौकार, २ षटकारांच्या साह्याने ८१ धावा ठोकल्या. रायडू बाद झाल्यानंतर पार्थिवने जोस बटलरसोबत (२४) ३७ धावा जोडल्या. बटलरने १३ चेंडूंत ३ चौकार, १ षटकार मारला. केरोन पोलार्डने ५ चेंडूंत १० धावा काढल्या. पंजाबने अखेरीस चांगली गोलंदाजी करताना मुंबईला २०० चा टप्पा गाठू दिला नाही. पंजाबकडून संदीप शर्माने १ विकेट, जॉन्सनने ४३ धावांत १ विकेट, मोहितने ३८ धावांत ३ विकेट घेतल्या.

पार्थिवचे १७ वे अर्धशतक
पार्थिव पटेलचे (८१) हे टी-२० मधील १७ वे अर्धशतक ठरले. तो १९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. रायडूने ३७ चेंडूंत ६५ धावा काढताना ४ षटकार, ४ चौकार मारले. रायडूनेसुद्धा १७ वे अर्धशतक ठोकले. त्याने टी-२० मध्ये ३००० धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा रायडू १५ वा भारतीय फलंदाज ठरला.

आज हैदराबादपुढे पुणे
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्ससमाेर मंगळवारी हैदराबादचे आव्हान असेल. सलग तीन विजयांनंतर हैदराबादची टीम फॉर्मात परतली आहे. धोनीच्या नेतृत्वात पुणे सुपरजायंट्सने पराभवाचा चौकार मारला आहे. विजयी ट्रॅकवर परतण्याचे प्रयत्न धोनी ब्रिगेडचे असेल.

धावफलक
मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६
8रोहित झे. नाईक गो. संदीप ०० ०२ ०० ०
पार्थिव झे. मार्श गो. जॉन्सन ८१ ५८ १० २
रायडू झे. वोहरा गो. अक्षर ६५ ३७ ०४ ४
बटलर त्रि. गो. मोहित २४ १३ ०३ १
पोलार्ड झे. संदीप गो. मोहित १० ०९ ०० ०
हार्दिक झे. मिलर गो. मोहित ०४ ०२ ०१ ०
कृणाल पंड्या नाबाद ०० ०० ०० ०
अवांतर : ५. एकूण : २० षटकांत ६ बाद १८९ धावा. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-२०-१, जॉन्सन ४-०-४३-१, अक्षर पटेल ४-०-४१-१, मोहित शर्मा ४-०-३८-३, मॅक्सवेल १-०-११-०, पी. साहू ३-०-२५-०.
किंग्स इलेव्हन पंजाब धावा चेंडू ४ ६
िवजय झे. बटलर गो. साउथी १९ १३ २ १
वोहरा झे. बटलर गो. बुमराह ०७ ११ ० ०
शॉन मार्श झे. रायडु गाे. साउथी ४५ ३४ ३ १
ग्लेन मॅक्सवेल त्रि. गाे. बुमराह ५६ ३९ ५ १
डेव्हिड मिलर नाबाद ३० १७ १ २
निखिल नाईक त्रि. गाे. बुमराह ०१ ०३ ० ०
अक्षर त्रि. गाे. मॅक्लिनघन ०० ०२ ० ०
जाॅन्सन त्रि.गाे. मॅक्लिनघन ०१ २ ० ०
माेहित शर्मा नाबाद ०० ० ० ०
अवांतर : ५. एकूण : २० षटकांत ७ बाद १६४ धावा. गोलंदाजी : साऊथी ४-०-२८-२, मॅक्लिनघन ४-०-३२-२, बुमराह ४-०-२६-३, कृणाल पंड्या २-०-२०-०, हरभजन ४-०-३१-०, पाेलार्ड २-०-२५-०.

पुढील स्लाइडवर वाचा, रैनाने विजयाचे श्रेय दिले पत्नीला...