आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डेव्हिड मिलरच्या षटकाराने कोलकाता पोलिस कर्मचाऱ्याची गेली दृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - कोलकाता नाइटराइडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात डेव्हिड मिलरच्या एका फटकाऱ्यामुळे कोलकाता पोलिस हवालदार अलोक यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली आहे. अलोक कोलकाता पोलिस बटालियन 5 चे उपायुक्त देवाशिष सरकार यांचे वाहन चालक आहेत. ते इडन गार्डनच्या जी ब्लॉकमध्ये कर्तव्यावर होते. सध्या 53 वर्षीय आलोकच्या डोळ्यावर दक्षिण कोलकाता येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय आहे प्रकरण
शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात KKR च्या आंद्रे रसेलच्या चेंडूवर पंजाब डेविड मिलरने एक जोरदार षटकार ठोकला. चेंडू बाऊंड्रीजवळ कर्तव्यावर असलेल्या अलोकच्या उजव्या डोळ्यावर लागला. यानंतर त्यांना लगेचच असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) च्या मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. यानंतर अलोक यांना अलीपोर येथील एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. सध्या त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. या सामन्यात KKR ने पंजाबला एक गडी राखून हरवले होते. मिलरने 11 चेंडूत 2 चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 27 धावा केल्या होत्या.
विभागाने उचलला संपूर्ण खर्च
कोलकाता पोलिस विभागाचे संयुक्त आयुक्त राजीव मिश्रा यांनी सांगितले की, पोलिस विभाग अलोकच्या संपूर्ण उपचारांचा खर्च उचलणार आहे. ते म्हणाले की, "ही अत्यंत दुःखद घडना आहे. आमचा विभाग त्यांच्या कुटुंबाला हवी ती मदत करणार आहे. त्यांना कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही, याबद्दल आम्ही संपूर्ण लक्ष देणार आहोत. तसेच अलोकला सर्वात चांगले उपचार देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत."

गांगुलीनेही दुःख व्यक्त केले.
या दुर्घटनेवर टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगूलीनेही दुःख व्यक्त केले. तो म्हणाला की, "जे काही झाले, ते अत्यंत दुःखद आहे. मात्र याप्रकारच्या दुर्घटनेसाठी कोणत्याही खेळाडूला दोषी ठरवता येत नाही."

पुढील स्लाईडवर पाहा, सामन्यादरम्यान डेव्हिड मिलरचे या सामन्यातील काही फोटो...