आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL : Bangalor Challengers Defeated Hyderabad By 45 Runs

आयपीएल: बंगळुरू चॅलेंजर्सचा 'रॉयल' विजय, हैदराबादवर ४५ धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर एकमेकांचे अभिनंदन करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे डिव्हिलर्स आणि विराट कोहली. - Divya Marathi
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर एकमेकांचे अभिनंदन करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे डिव्हिलर्स आणि विराट कोहली.
बंगळुरू - टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (७५) आणि द. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ए.बी. डिव्हिलर्सच्या (८२) तुफानी फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या पराक्रमाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल-९ मध्ये आपल्या पहिल्या लढतीत विजय मिळवला. बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला ४५ धावांनी पराभूत केले. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात हैदराबादला ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५८ धावा काढल्या.

हैदराबादकडून शिखर धवन ८, हेनरिक्स १९, नमन ओझा ०, दीपक हुड्डा ६ हे खेळाडू अपयशी ठरले. इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गनने नाबाद २२ तर कर्ण शर्माने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. बंगळुरूकडून गोलंदाजीत वॉटसनने ३० धावांत २ विकेट तर चहलने ४३ धावांत २ गडी बाद केले. वॉर्नर होता तोपर्यंत हैदराबादच्या आशा जिवंत होत्या. वॉर्नर बाद होताच इतर फलंदाजांनीही नांग्या टाकल्या.

तत्पूर्वी, आक्रमक फलंदाजांनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल-९ मध्ये धडाकेबाज सुरुवात करताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ बाद २२७ धावा काढल्या. ए.बी. डिव्हिलर्सने ८२ आणि विराट कोहलीने ७५ धावा ठोकल्या. युवा खेळाडू सरफराज खानने नाबाद ३५ धावांची आक्रमक खेळी केली. कोहली आणि डिव्हिलर्सने दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची दीडशतकी भागीदारी केली. यानंतर सरफराज खान आणि केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी अभेद्य ४४ धावांची भागीदारी केली.

सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीस बोलावले. बंगळुुरूच्या प्रेक्षकांना कोहली आणि डिव्हिलर्सच्या बॅटीतून चौकार, षटकारांचा पाऊस बघायला मिळाला. डिव्हिलर्सने ६ षटकार, ७ चौकार तर कोहलीने ३ षटकार, ७ चौकार मारले. स्फोटक फलंदाज क्रिस गेल (१) लवकर बाद झाल्याचा बंगळुरूवर काहीही परिणाम झाला नाही. गेल बाद झाल्यानंतर कोहली-डिव्हिलर्सने डाव सावरला. युवा फलंदाज सरफराज खानने अवघ्या १० चेंडूंत ५ चौकार, २ षटकार ठोकत नाबाद ३५ धाव काढल्या. अनुभवी शेन वॉटसनने ३ षटकारांसह १९ धावा काढल्या. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहेमानने २६ धावांत २ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारने ५५ धावांत २ विकेट घेतल्या.
पुढे वाचा.. भुवनेश्वर सर्वात महागडा, धावफलक, मुंबई इंडियन्ससमोर आज
कोलकाता नाइट रायडर्स, आयपीएलसाठी मलिंगाला एनओसी मिळाली नाही