आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायपीएलचे फायनल मुंबईएेवजी बंगळुरूत, कोलकात्याला फ्ले ऑफ सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १३ सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर अायपीएल फ्रँचायझी अाणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची चांगलीच धावपळ झाली .मात्र, शुक्रवारी आयपीएल कौन्सिल बैठकीत मुंबई इंडियन्सने जयपूर तर रायझिंग पुण्याने विशाखापट्टणमला पसंती दिली. अंतिम लढतीसाठी मुंबईऐवजी बंगळुरुला पसंती देण्यात आली आहे. आयपीएल कौन्सिलने रायपूर, कानपूर व विशाखापट्टणमचे पर्याय या दाेन्ही टीमसमाेर ठेवले हाेते. कोलकात्याला फ्ले ऑफच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येईल.