आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल : चार सदस्यीय समिती गठित; शिर्के, शुक्ला, ठाकूर यांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- श्रीनिवासन यांच्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राज कुंद्राच्या राजस्थान रॉयल्सवरील बंदीच्या निर्णयाच्या शिफारशीमुळे बधिर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला रविवारच्या तातडीच्या बैठकीत काहीच निर्णय घेता आला नाही. लोढा समितीच्या निर्णयाचा आदर करावा आणि त्या निर्णयांच्या पडसादांचा आणि परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची/समितीची आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्थापना करावी, असा निर्णय घेण्यात आला.

या अभ्यास गटात स्वत: राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर, ज्येष्ठ सदस्य अजय शिर्के आणि ज्योतिरादित्य शिंदे आणि एक कायदेतज्ज्ञ यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अभ्यास गटावरच, दोन संघ बाद झाल्यामुळे होणारे परिणाम व त्यावर उपाययोजना करण्यासाठी अन्य संघांचा समावेश करावा का, याबाबत अहवाल सहा आठवड्यांच्या आत सादर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

अभ्यास गटातील सदस्य आयपीएलशी संबंधित व्यावसायिक भागीदार व अन्य घटकांशी समन्वय साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. अभ्यास गट बीसीसीआय कार्यकारिणीचेही मत विचारात घेऊन मगच आपला अहवाल सादर करणार आहे. क्रिकेट या खेळाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचाही अभ्यास गट विचार करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...