आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल: रायझिंग पुणे टीमची शिकार; गुजरात लायन्सचा दुसरा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकाेट - सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लायन्स टीमने गुरुवारी नवव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयाची नाेंद केली. यजमान गुजरातच्या लायन्सने अापल्या घरच्या मैदानावर धाेनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सची शिकार केली. गुजरात टीमने १८ षटकांत ७ गड्यांनी सामना जिंकला. गुजरात टीमचा लीगमधील हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. धाेनीच्या पुणे टीमला स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना पुणे टीमने ५ बाद १६३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात गुजरात लायन्सने ३ गड्यांच्या माेबदल्यामध्ये लक्ष्य गाठले. गुजरातकडून अॅराेन फिंच (५०), मॅक्लुम (४९), रैना (२४) अाणि ब्राव्हाेने (नाबाद २२) झंझावाती खेळी करून विजयश्री खेचून अाणली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून धाेनीने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सलामीवीर अजिंक्य रहाणे अाणि फाफ डुुप्लेसिसने सार्थकी लावला. त्यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सला २७ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. गत सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरलेला रहाणे २१ धावा काढून तंबूत परतला. त्याला तांबेने पायचीत केले. त्यानंतर अालेल्या केविन पीटरसनने डुप्लेसिसला माेलाची साथ दिली. या दाेघांनी गुजरात लायन्सच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. पीटरसनने ३७ धावांचे याेगदान दिले. त्याने ३१ चेंडूंत ही धावसंख्या उभी केली. मात्र, त्याला ब्राव्हाेने त्रिफळाचीत केले. त्यापाठाेपाठ डुप्लेसिस बाद झाला. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार व चार षटकारांच्या अाधारे ६९ धावांची खेळी केली. त्यानंतर स्मिथ हा ५ धावांवर बाद झाला. धाेनीने नाबाद २२ धावा काढल्या. त्यामुळे रायझिंग पुणेला सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभी करता अाली.

अॅराेन फिंचचे अर्धशतक
यजमान गुजरात लायन्सकडून सलामीवीर अॅराेन फिंचने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने पुण्याच्या गाेलंदाजीला फाेडून काढत झंझावाती ५० धावा काढल्या. त्याने ३६ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे ५० धावा काढल्या. याशिवाय फिंचने सलामीवीर मॅक्लुमसाेबत ८५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यादरम्यान, मॅक्लुमचे अर्धशतक हुकले. त्याला ईशांत शर्माने ४९ धावांवर झेलबाद केले. त्याने ३१ चेंडूंत प्रत्येकी तीन चाैकार अाणि षटकारांच्या अाधारे ही धावसंख्या काढली.

जडेजा, तांबे चमकले
गाेलंदाजीमध्ये गुजरात लायन्सचे रवींद्र जडेजा अाणि प्रवीण तांबे हे दाेघे चमकले. या दाेघांनीही धारदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी दाेन गडी बाद केले. तसेच ब्राव्हाेने एक विकेट घेतली. तांबेने चार षटकांमध्ये ३३ धावा देताना हे यश संपादन केले. त्याने पुणे टीमच्या सलामीवीर अजिंक्य रहाणे अाणि फाफ डुप्लेसिसला बाद करून संघाला महत्त्वाचे दाेन बळी मिळवून दिले. तसेच जडेजाने चार षटकांमध्ये १८ धावा देत दाेन विकेट मिळवल्या.