आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-MI vs RPS: रायझिंग पुणे सुपरजायंट्सने राेखली मुंबईची घाेडदाैड!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई- स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे संघाने साेमवारी अायपीएलमध्ये जबरदस्त फाॅर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सची विजयी घाेडदाैड राेखली. पुणे संघाने मुंबई इंडियन्सवर ३ धावांनी राेमहर्षक विजय संपादन केला. त्यामुळे मुंबईची सलग सातव्या विजयाची माेहीम बाधित झाली. दुसरीकडे पुणे संघाने विजयाचा चाैकार मारला.

युवा गाेलंदाज जयदेव उनाडकत (२/४०) अाणि बेन स्टाेक्स (२/२१) यांनी धारदार गाेलंदाजी करताना रायझिंग पुणे संघाला सुपर विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर ८ गड्यांच्या माेबदल्यात १५७ धावांपर्यंत मजल मारता अाली. मुंबईकडून कर्णधार राेिहत शर्मा, पार्थिव पटेल (३३) अाणि हार्दिक पांड्याने (१३) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ  ठरली. 

नाणेफेक जिंकून यजमान मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलामीवीर अजिंक्य रहाणे अाणि राहुल त्रिपाठीने  पुणे टीमला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी संघाला ७६ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, गाेलंदाज कर्ण शर्माने मंुबईला पहिला बळी मिळवून दिला. त्याने सलामीच्या रहाणेला बाद केले. रहाणेने ३२ चेंडूंत ५ चाैकार अाणि एका षटकारासह ३८ धावांची खेळी केली.

राेहितची झुंज व्यर्थ
दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी कर्णधार राेहित शर्माने दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि ३ उत्तुंग षटकारांच्या अाधारे ५८ धावांची खेळी केली. मात्र,त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. 
 
कर्ण, बुमराह चमकले
मुंबई इंडियन्सकडून युवा गाेलंदाज कर्ण शर्मा अाणि जसप्रीत बुमराह  चमकले. त्यांनी  प्रत्येकी २ विकेट घेतल्या.  मिशेल जाॅन्सन व हरभजनने प्रत्येकी १ गडी बाद केला. 

हरभजनच्या २०० विकेट
मुंबईच्या हरभजन सिंगने टी-२० मध्ये अापल्या २०० विकेट पूर्ण केल्या. त्याने साेमवारी पुणेविरुद्ध १ बळी घेतला. यासह त्याने २०० बळी पुर्ण केले. त्याने २२५ सामन्यांत हा पल्ला गाठला. 
 
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स    धावा     चेंडू     ४    ६ 
अजिंक्य रहाणे झे. गाे. कर्ण    ३८    ३२    ०५    १
त्रिपाठी झे.पाेलार्ड गाे. कर्ण    ४५    ३१    ०३    २
स्मिथ त्रि.गाे. हरभजन    १७    १२    ०२    ०
धाेनी त्रि.गाे. बुमराह    ०७    ११    ००    ०
स्टाेक्स त्रि.गाे. जाॅन्सन    १७    १२    ०२    ०
तिवारी पायचीत गाे. बुमराह    २२    १३    ०४    ०
डॅनियल क्रिस्टियन नाबाद    ०८    ०७    ०१    ०
वाॅशिंग्टन सुंदर नाबाद    ०२    ०२    ००    ०
अवांतर : ४. एकूण : २० षटकांत  ६ बाद १६० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-७६, २-९३, ३-१०४, ४-१२६, ५-१३८, ६-१५८. गोलंदाजी : मिशेल जाॅन्सन ४-०-३४-१, मॅक्लिनघन ४-०-३६-०, कर्ण शर्मा ४-०-३९-२, जसप्रीत बुमराह ४-०-२९-२, हरभजनसिंग ४-०-२०-१.
मुंबई इंडियन्स     धावा     चेंडू     ४    ६
पार्थिव पटेल त्रि.गो. वॉशिंग्टन    ३३    २७    ०४    ०
बटलर झे. वाॅशिंग्टन गाे. स्टाेक्स १७    १३    ०३    ०
राणा झे. उनाडकत गो. क्रिस्टियन ०३     ०९    ००    ०
रोहित शर्मा झे. गो. उनाडकत    ५८    ३९    ०६    ३  
कर्ण शर्मा त्रि.गो. स्टोक्स     ११    १०    ००    १
पोलार्ड झे. स्मिथ गो. ताहिर    ०९    ०९    ०१    ०
हार्दिक झे. स्टाेक्स गो.उनाडकत १३    ११    ०२    ०
हरभजनसिंग नाबाद     ०७    ०२    ००    १
मॅक्लिनघन धावबाद    ००    ००    ००    ०
मिशेल जॉन्सन नाबाद     ००    ००    ००    ०
अवांतर : ६. एकूण : २० षटकांत ८ बाद १५७. गडी बाद होण्याचा क्रम : १-३५, २-५२, ३-६०, ४-८६, ५-१२२, ६-१४४, ७-१५०, ८-१५१. 
गोलंदाजी : वॉशिंग्टन ४-०-२६-१, शार्दुल ३-०-२९-०, उनाडकत ४-०-४०-२, स्टोक्स ४-१-२१-२, क्रिस्टियन ४-१-६-१, ताहिर ४-०३१-१.
बातम्या आणखी आहेत...