आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 लक्झरी यॉटचा मालक आहे मयप्पन, समुद्रावर एन्जॉय करतो हॉलिडेज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमीअर लीग अर्थात आयपीएलच्या सहाव्या सत्रातील भ्रष्टाचार व स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच बेटिंगमध्ये अडकलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचा गुरूनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा या दोघांवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. दोघांना बीसीसीआयशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आता सहभागी होता येणार नाही.
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या आर.एम.लोढा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने आज (मंगळवार) आपला निर्णय सुनावला. क्रिकेटच्या इतिहासातील हा सगळ्यात कठोर निर्णय आहे. क्रिकेटचे पावित्र्य अबाधित राहावे, समाजकंटकांपासून खेळाचे रक्षण करण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे, असे सांगून न्यायाधीश लोढा यांनी बीसीसीआयची कानउघाडणी देखील केली आहे.
25 लक्झरी बोटचा मालक आहे मयप्प...
गुरुनाथ मयप्पन हा साउथ फिल्म प्रॉडक्शन कंपनी 'आयव्हीएम'चा मालक आहे. ओव्हर ऑल इंडियामध्ये त्याच्या 25 लक्झरी यॉट (बोट) आहेत. गुरुनाथ समुद्रावर सुट्‍ट्या एन्जॉय करतो. मागील वर्षी त्याने बल डेकर ‘रिव्हिएरा 53 इनक्लोज्ड फ्लायब्रिज' सुमारे नऊ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. ही बोट सध्या कोचीमध्ये आहे. या बोटवर मयप्पन आपले निवांत क्षण घालवतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गुरुनाथ मयप्पनच्या लक्झरी यॉटचे फोटो....