आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Teams Price 2008 To Till: Pune, Rajkot To Host New IPL Franchises

नीता अंबानींनी 748 कोटींत खरेदी केला होता Mumbai Indians संघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL-9 अर्थात 2016 मधील सीजनमध्ये 8 संघ मैदानात उतरणार आहेत. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) व राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघाना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

संजीव गोयंका मालक असलेली न्यू रायजिंग कंसोर्टियमने पुणे टीम तर नरेंद्र बंसल हे मालक असलेली मोबाइल निर्माता भारतीय कंपनी इंटेक्सने राजकोट टीम खरेदी केली आहे. न्यू रायझिंगने 16 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि इंटेक्सने 10 कोटी रुपयांपेक्षा कमीची रिव्हर्स बोली लावून नव्या फ्रँचायझी टीम खरेदी केल्या. या दोन्ही संघांना चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या जागी सामील करण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्स सगळ्यात महागडा संघ..
IPLच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा सर्वात महागडा संघ ठरला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी 2008 मध्ये 748 कोटी रुपयांत (111.9 मिलियन डॉलर) हा संघ खरेदी केला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, प्रिति झिंटासह IPLच्या इतर संघांचे मालक आणि त्यांनी संघासाठी मोजलेली किंमत....